गृहिणींसाठी घरबसल्या पैसे कमावण्याच्या जबरजस्त संधी; महागाई आणि बेरोजगारीवर सुपरहीट पर्याय
घरच्या कामातून सवड काढून घरीच काहीतरी काम मिळावे अशी अनेक गृहिणींची भावना असते. अशा कामाच्या शोधात त्या असतात. त्यामुळे महिलांना घरची कामं सांभाळून करता येण्यासारखी कामं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या पैसे कमाऊ शकता.
मुंबई : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे असंख्य पुरूष असो की स्त्रीया नोकरीपेक्षा छोटे मोठे स्वतःचे उद्योग करण्याकडे वळत आहेत. त्यामुळे घरच्या कामातून सवड काढून घरीच काहीतरी काम मिळावे अशी अनेक गृहिणींची भावना असते. अशा कामाच्या शोधात त्या असतात. त्यामुळे महिलांना घरची कामं सांभाळून करता येण्यासारखी कामं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या पैसे कमाऊ शकता.
फॅशन डिझाइनर
आजकाल फॅशनेबल कपड्यांचा क्रेझ तरुण तरुणींमध्ये वाढलाय. ट्रेडिंग फॅशनचं ज्ञान असणाऱ्या गृहिणींना या बिझिनेसमध्ये चांगली कमाईची संधी आहे. या क्षेत्राशी संबधीत शॉर्ट टर्म कोर्स करून याचे काम सुरू करता येते.
ट्युशन क्लासेस
गृहिणींचे शिक्षण चांगले झाले असल्यास, शालेय विद्यार्थ्यांची घरघुती शिकवणी घेता येईल. कोव्हिडमुळे सध्या हा व्यवसाय सर्व काळजी घेऊन करणे गरजेचे आहे. यामुळे दरमहा चांगले उत्पन्न येईल आणि लहानग्यांना शिकवण्याचा आनंदही मिळेल.
ऑनलाईन सेलिंग
आजकाल इंटरनेटच्या मदतीने नवे आणि जुने सामान विकण्याचा ट्रेंड मार्केटमध्ये जोर धरत आहे. तुम्ही तुमच्या क्रिएटीव्हिटीने बनवलेले सामान जसे की, पेंटिंग्स, डिझायइनर कपडे, पर्स वेगैरे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विकू शकता. ऑनलाईन विक्रीसाठी ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल इत्यादी प्लॅटफार्मचा विचार करू शकता.
Youtube Video
स्मार्ट गृहिणींसाठी युट्यूब व्हिडिओ हा एक उत्तम कमाईचा पर्याय आहे. तुम्हाला येत असलेले कोणतेही चांगले कौशल्य तुम्ही जगाला शिकवू शकता. किंवा माहितीपर व्हिडिओ शेअर करू शकता. तुमच्या युट्यूब चॅनेलची जसजशी प्रसिद्धी होत जाईल तसतसे युट्यूबकडून तुम्हाला उत्पन्न मिळणे सुरू होईल.
ब्लॉगिंग
जर तुम्हाला चांगले लेख लिहण्याची आवड असेल तर तुम्ही ऑनलाईन ब्लॉग सुरू करू शकता. ब्लॉगिंगमध्ये तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता. खाद्यपदार्थांपासून ते ट्रेक, स्पोर्ट, आर्थिक, सामाजिक राजकीय इत्यादी कोणत्याही विषयांवर ब्लॉगिंग सुरू केल्यास नक्कीच चांगले उत्पन्न सुरू होऊ शकते.
ब्युटी पार्लर
तुम्ही तुमच्या कॉलनी किंवा सोसायटीमध्ये महिलांना घरातूनच पार्लर चालवताना पाहिले असेल. विश्वास ठेवा तुमचं काम चांगलं असेल आणि आजुबाजूला राहणाऱ्या स्त्रीयांची संख्या भरपूर असेल तर, तुम्हाला हा व्यवसाय जबरजस्त उत्पन्न देणारा ठरतो.
बेबी सेटिंग आणि प्ले वे स्कूल
आज काल नवरा बायको आपल्या करिअरमध्ये गुंतलेले असल्याने घराकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. अशातच, त्यांना आपल्या लहान मुलांकडेही लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे असे कपल आपल्या मुलांसाठी चाइल्ड केअर सेंटरच्या शोधात असतात. या संधीचा गृहिणींनी फायदा घ्यायला हवा. बेबी सिटिंग आणि प्ले वे स्कूलचे काम सुरू करून चांगले पैसे कमावता येऊ शकते.
योगा क्लासेस
कोविडमुळे नागरिक आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागृत झाले आहेत. त्यामुळे योगा शिक्षकांची मागणी वाढली आहे. महिलादेखील आपल्या आजुबाजूला योगा क्लासेसच्या शोधात असतात. त्यामुळे हा व्यवसाय तुम्हालाही फीट आणि निरोगी ठेवतो. तसेच उत्पन्न देखील देतो.
टिफिन सर्व्हिसेस
लोकं नोकरी आणि इतर कामांसाठी दुसऱ्या शहरांमध्ये जातात. तेथे नोकरीमुळे त्यांना स्वयंपाक करणे शक्य नसते. अशा लोकांसाठी टिफिन सर्व्हिसेस सुरू केल्याने चांगले उत्पन्न मिळवता येते.
ऑनलाईन ट्युशन
कोविड काळात ऑनलाईन शिक्षणाची मागणी वाढली आहे. येथून पुढच्या आधुनिक जगात शिक्षणाचे डिजिटलायझेशन होणार आहे. त्यामुळे ऑनलाईन ट्युशनवरही पालकांचा भर असणार आहे. गृहिणींना घरबसले हे काम करता येऊ शकते. त्यासाठी Tutor.com, OkTutor.net,Wiziq, TutorCity.in, Tutor India साऱख्या वेबसाईटवर ऑनलाईन ट्यूटर बनता येऊ शकते.
ट्रान्सलेटर
जर तुम्ही इंग्रजीसह इतर भाषांमध्ये लिहू शकता तर ट्रान्सलेशनचा जॉब तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो. अशा अनेक कन्टेंट रायटींग कंपन्यांना ट्रान्सलेशन करून देणाऱ्या व्यक्तींची गरज असते. त्यामुळे हे काम घरबसल्या देखील आल्या सवडीनुसार होऊ शकते.
मेनबत्ती बनवणे
बाजारात विविध रंगाच्या डिझाइनच्या मेनबत्ती मिळतात. या मेनबत्या वाढदिवस किंवा इतर अनेक इव्हेंटमध्ये वापरल्या जातात. त्यामुळे हा व्यवसायही घरबसल्या करता येतो.
टेलिमार्केटिंग
टेलिमार्केटिंग हा सुद्धा घरबसल्या करण्यासारखा उत्तम जॉब आहे. कंपनीच्या प्रोडक्टची मार्केटिंगचे आपल्याकडे कौशल्य हवे. आवाज चांगला हवा आणि भाषेवर पकड हवी. मार्केटिंगच्या माध्यमातून कंपनीदेखील तुम्हाला कमीशन देणे सुरू करते. हा देखील उत्पन्नाची चांगली पर्याय आहे.