Trending Bhangra Dance Video: पंजाबी लग्नाचा स्वॅगच वेगळा असतो. कोणतीही पार्टी आणि लग्न समारंभ पंजाबी डान्सशिवाय (Panjabi Dance) अपुर्ण असतं. पंजाबी संगीतामुळे कार्यक्रमाला आणखी रंग चढतो. अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसतंय. या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध सरदारांचा भन्नाट डान्स पहायला मिळतोय. (Trending Bhangra Dance Video of two elder sikh men in party goes viral on internet)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही दोस्तांनी 'यार बोलदा' या गाण्यावर डान्स केला. दोन वृद्ध शीख त्यांच्या किलर डान्स स्टेप्ससह डान्स (bhangra dance) फ्लोअरला आग लावताना दिसत आहेत. वृद्धांचा डान्स पाहून बॅन्ड वाल्याला देखील उत्साह वाढतो. त्याच्याभोवती उभे असलेले टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहित करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.


आणखी वाचा - Russia-Ukraine War: रस्त्यावरुन कार जात असताना अचानक पडलं क्षेपणास्त्र, व्हिडिओ पाहिल्यावर बसेल मोठा धक्का


एका लग्न समारंभात या दोन वृद्धांचा अप्रतिम डान्सचा हा व्हिडिओ ऑनलाईन व्हायरल झाला आहे. पिंक पँथर स्टुडिओ नावाच्या पेजने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Instagram Viral Video) शेअर केला आहे. हा डान्स व्हिडिओ आतापर्यंत 947 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय.


पाहा व्हिडीओ -



दरम्यान, व्हिडीओ पाहून (Viral Video) अनेकांना शेअर करण्याचा मोह आवरला नाही. वृद्धांचा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केली आहे. वय हा फक्त एक आकडा आहे, असं एका युझरने कमेंट केली. उतरत्या वयात देखील प्रत्येक क्षण आनंदात जगणं गरजेचं असतं.