King Cobra Video : साप (Snake) म्हटलं की प्रत्येकाची ततफफ होते.  जर अचानक तुमच्या समोर साप आला तर काय होणार...नक्कीच घाम फुटणार. साप चावला की मृत्यू होतो. त्यामुळे साप म्हणजे मृत्यू आणि डोळ्यासमोर मृत्यू पाहिल्यावर माणसाचं काय होणार? पण सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ (funny video on social media) समोर आला. एका माणसाचा प्रताप पाहून तुम्हाला हसू की रडू असं होईल. 


हेही वाचा - Video : भयानक! घरात चिमुकलीवर वाघाचा हल्ला, पुढे काय झालं पाहा...


अरे देवा! बापरे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया आपल्या भयानक आणि धक्कादायक व्हिडीओ (Horrible and shocking video) मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतं आहे. दारूच्या नशेत या माणसाने जे केलं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. एक व्यक्ती दारुच्या नशेत हॉस्पिटलमध्ये (Hospital video) इमर्जन्सी वार्डामध्ये चक्क किंग कोब्रा (King Cobra Video) घेऊन आला. गंमतीशीर गोष्ट तर पुढे आहे. या माणसाला सापाने दोन वेळा दंश केला. त्याचा पायावर आणि हातावर दोनदा चावल्यानंतर तो सापच मेला. हो माणूस नाही तर साप मेला...(Trending King Cobra Video viral on Instagram nmp)




डॉक्टरांना बसला धक्का!


डॉक्टरांना विश्वास बसावा म्हणून त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीतून साप हॉस्पिटलमध्ये आणला. कारण डॉक्टराने त्यावर उपचार करावे म्हणून त्याने ही शक्कल लढवली. ही घटना उत्तर प्रदेशातील कुशीनगरच्या जिल्हा हॉस्पिटलमधील आहे. मन्सूर नावाच्या या व्यक्तीला जेव्हा साप चावला तर त्याने दारुच्या नशेत कोब्राला मारून टाकलं आणि नंतर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  होतो आहे.