Love Story : प्रेम आंधळं असं म्हटलं जातं, याचा प्रत्यय आणणारी एक अनोखी घटना समोर आली आहे. शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थिनीशी लग्न केलं. यासाठी शिक्षिकेने चक्क लिंग बदल (Gender Change) शस्त्रक्रिया केली. यानंतर दोघींनीह लग्न केलं राजस्थानमधल्या (Rajasthan) भरतपूर इथही ही अनोखी लव्ह स्टोरी (Love Story) सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरतपूरमधल्या राजकीय माध्यमिक विद्यालयात मीरा या पीटी टीचर म्हणून कार्यरत आहेत. तर कल्पना नावाची विद्यार्थिनी या शाळेत शिकते. कल्पना ही उत्तम कबड्डीपटू आहे आणि ती तब्बल तीन वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळली आहे. कल्पनाचा खेळ शिक्षिका मीराला प्रचंड आवडायचा. यातूनच शिक्षिका मीरा कल्पनाच्या प्रेमात पडल्या. शिक्षिकेने मीरासमोर आपल्या मनातील भावना व्यक्त केली. याला कल्पनानेही प्रतिसाद दिला. दोघांमधलं प्रेम फुलत गेलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


लिंगबदलाचा घेतला निर्णय
लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मीरा यांनी पुढाकार घेत लिंग बदल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीने शस्त्रक्रिया करुन घेतली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर मीराची आरव बनली. यानंतर कल्पना आणि आरवने लग्न केलं. विशेष म्हणजे दोघींकडच्या कुटुंबियांनी याला आडकाठी केली नाही. आरवला चार मोठ्या बहिणी असून चारही जणींची लग्न झाली आहेत. 


महिला कोट्यातून लागली होती नोकरी
आधी मीरा आणि आता असलेल्या आरवला महिला कोट्यातून सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी लागली होती. शाळेतच कल्पनाशी ओळख झाली. लिंग बदलला कल्पनानेही पाठिंबा दिला होता. पण आता नोकरीत नाव आणि लिंग बदलावरुन अनेक अडचणीत येत असल्याचं आरवने सांगतिलं. 


आरवच्या वडिलांची प्रतिक्रिया
या लग्नावर आरवच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले मला पाच मुलीच आहे. सर्वात लहान असलेली मीरा मुलगी असली तरी ती लहानपणापासून मुलासारखीच रहात होती. मुलांबरोबरच खेळत होती, आता ती मुलगाच झाल्याचा मला आनंद आहे, आरव आणि कल्पनाचं लग्नाबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.