Trending News : आजच्या तंत्रज्ञानाच्या (Technology) युगात मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलमुळे सर्वकाही शक्य झालं आहे. पण याचे तोटेही सहन करावे लागतायत. आजच्या तरुण पिढीला मोबाईलचं व्यसन लागलं आहे. मोबाईलसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन गेमच्या नादात एका शेतकऱ्याच्या मुलाने तब्बल 95 लाख रुपये गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची सध्या चांगलीच चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी काय आहे घटना?
तेलंगनामधील (Telangana) रंगेृारेड्डी जिल्ह्यातील ही हैराण करणारी घटना आहे. सीतारामपूर गावात राहणाऱ्या श्रीनिवास रेड्डी या शेतकऱ्याची 10 एकर जमीन सरकारने तेलंगना स्टेट इंडस्ट्रियल इंफ्रास्ट्रक्चर कॉरपोरेशनसाठी (TSIIC) अधिग्रहीत केली. याबदल्यात श्रीनिवास यांना प्रति एकर 10.5 लाख रुपयांच्या हिशोबाने एक कोटी 5 लाख रुपये मोबदला मिळाला.


मोबदल्याच्या पैशातून जमीन विकत घेणार होते
मिळालेल्या पैशातून श्रीनिवास यांनी हैदराबादच्या बाहेर असलेल्या शमशाबादमध्लाय मल्लापूर भागात अर्धा एकर जमीन विकत घेण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी 70 लाख रुपयांचा करार केला, शिवाय 20 लाख रुपये आगाऊ दिले. पण इतर पैसे त्यांच्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये (Online Game) घालवले. यात श्रीनिवास रेड्डी यांचं कुटुंब पूर्णपणे कंगाल झालं. 


मोबाईलवर ऑनलाईन गेमचं व्यसन
श्रीनिवास रेड्डी यांचा छोट्या मुलाला मोबाईलवर 'किंग 567' या ऑनलाई कॅसिनो गेमचं (Cassino Game) व्यसन जडलं होतं. मुलगा हर्षवर्धन रेड्डी हा शिक्षित असल्याने श्रीनिवास यांनी बँक अकाऊंटची सर्व माहिती मुलाला दिली होती. मुलाने ते अकाऊंट 'गुगल पे' आणि 'फोन पे' ला जोडलं होतं. याचं माध्यमातून मुलाने थोडे थोडे करत सर्व पैसै ऑनलाईन गेममध्ये खर्च केले.


सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल
आपल्या अकाऊंटमध्ये काहीच पैसे उरले नसल्याचं कळताच श्रीनिवास रेड्डी यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी याप्रकरणाची सायबर क्राइम (Cyber Crime) पोलिसात तक्रार दाखल केली. हर्षवर्धन रेड्डी हा हैदराबादमधल्या निजाम कॉलेजचा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. अशाप्रकारची देशातला ही पहिली घटना नाहीए. ऑनलाईन गेमच्या नादात अनेक मुलांना आपल्या आई-वडिलांचे लाखो रुपये खर्च केले आहेत. 


काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये एका 13 वर्षांच्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये 40 हजार रुपये घालवले होते. तर छत्तीसगडमध्ये एका मुलाने ऑनलाईन गेमध्ये तब्बल 3.22 लाख रुपये खर्च केले.