`रेव्ह पार्टी करायची आहे, सापाचं विष पाहिजे` मेनका गांधींच्या जाळ्यात असा अडकला Elvish Yadav
Elvish Yadav Rave Party: YouTuber आणि Big Boss OTT विजेता एल्विश यादव याच्यासहित चार जणांना रेव्ह पार्टीत नशेसाठी सापाचं विष वापरल्याप्रकरणी रंगेहाथ अटक करण्यात आलं. एल्विशला अटक करण्यासाठी बीजेपी खासदार आणि पीएफएच्या अध्यक्षा मेनका गांधी यांनी जाळं विणलं होतं.
Elvish Yadav Snake Venam: YouTuber आणि Big Boss OTT विजेता एल्विश यादवच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. एल्विश यादव नोएडामध्ये रेव्ह पार्ट्या (Rave Party) आयोजित करत असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे रेव्ह पार्टीमध्ये तो नशेसाठी सर्पविषाचा वापर करत होता. याप्रकरणी पोलिसांनी स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) करुन 5 जणांना अटक केली आहे. एल्विश यादवच्या घरातून 20 मिली सापाचं विष, 5 जिवंत नाग, एक अजगर, 2 मंडूळ साप आणि एक धामण जप्त केलीय आहे. याप्करणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवसह सहा लोकांविरोधात एपआयआर दाखल केला आहे.. या सर्वांना सापाच्या विषाची विक्री आणि रेव्ह पार्टी करण्याचा आरोप आहे.
मेनका गांधी यांनी विणलं जाळं
एल्विश यादवला अटक करण्यामागे सर्वात मोठी भूमिका बजावली ती भाजप खासदार आणि प्राण्यांसाटी काम करणाऱ्या पीपल फॉर एनिमल्सच्या अध्यक्षा मेनका गांधी (Maneka Gandhi) यांनी. एल्विशयादव गळ्यात साप अडकवून युट्यूबवर व्हिडिओ शेअर करत असे, शिवाय तो सापाचं विषही विकत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे एल्विशला रंगेहाथ अटक करण्याचं आम्ही ठरवल्याचं मेनका गांधी यांनी सांगितलं.
पीएफएचे अधिकारी गौरव गुप्ता यांनी याप्रकरणी नोएडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. एल्विश यादव नावाचा एक युट्यूबर जिवंत सापांबरोबर दिल्ली-एनसीआरच्या फार्महाऊसवर आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शूट करतो असं या तक्रारीत नमुद करण्यात आलं होतं. तसंच रेव्ह पार्टीत सापांच्या विषाचाही वापर होत असल्याचं यात नमुद करण्यात आलं होतं.
एल्विशला रंगेहाथ अटक
त्यानंतर पीएफएने एल्विश यादवला अटक करण्यासाठी प्लान तयार केला. खोटं गिऱ्हाईक बनून त्यांनी एल्विशला रेव्ह पार्टीसाठी सापाचं विष हवं असल्याचा फोन केला. या जाळ्यात एल्विश यादव अलगद अडकला. एल्विश यादवसह चार जणांना रंगेहाथ अटक करण्यात आलं. त्यांच्यावर एफआयआर दाखलक करण्यात आला आहे. याशिवाय एल्वीश यादव, राहुल यादव आणि अन्य चार जणांविरोधात वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, एल्विश यादवने आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. त्याने एक व्हिडिओ जारी केाला असून हे आरोप खरे असतील तर तपासात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं म्हटलंय. सध्या एल्विश यादव फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.