Interesting story : असं म्हटलं जातं एक दिवस सगळं राख होणार आहे. हिंदू धर्मात माणसाचा प्रवास थांबला की, त्याला अग्नी दिला जातो. मग माणसाच्या शरीराची राख होते. कुठलीही वस्तू (things) जाळली की त्याची देखील राख (ash) होते. पण असं काही अपवाद असतात, त्यातील एक अपवाद म्हणजे मेणबत्ती (candle)...तुम्ही कधी निरखून पाहिलं आहे का, जेव्हा मेणबत्ती (candle Fact) पेटवली जाते. त्याच्या मेणाचं काय होतं ते...आज आपण यामागील रंजक सत्य जाणून घेणार आहोत.


मेण कसं तयार होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नैसर्गिक चरबी, तेलापासून मेण तयार केलं जातं. कच्च्या तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेतून मेण बाहेर पडतं. त्याची मेणबत्ती बनवली जाते. मेण पाण्यात विरघळत नाही, परंतु पेट्रोलियम आधारित द्रवांमध्ये विरघळते.  तसंच 45 °C (113 °F) पेक्षा जास्त तापमानातही मेण द्रवात वितळते. (Trending News candel burning know what exactly happend intresting Fact)


खरं तर मेण हा HNP म्हणजेच हाय नॉर्मल पॅराफिन आहे, जो उच्च कार्बन साखळीचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बनची एक लांब साखळी असते.


 


हेसुद्धा वाचा - Trending News : श्वानाला कसं कळतं महिला प्रेग्नंट आहे ते? जाणून घ्या त्यांचा Sixth Sense बद्दल


 


मेणापासून बनविण्यात येणारी कोणतीही वस्तू जाळली किंवा जळाली तर ती राख स्वरुपात न राहाता पूर्णता नाहीशी होते. कारण मेण घन आहे. घन मेण जाळले जाऊ शकत नाही. मेण वितळल्यावरच ते जळते. म्हणून, जेव्हा मेण किंवा मेणबत्ती पेटवलं जातं, तेव्हा घन मेण प्रथम वितळते. मग ते द्रव रुपात जळते.


जेव्हा मेणबत्ती जळते तेव्हा ती उष्णता, प्रकाश आणि वायू अशा तीन प्रकारांमध्ये बदलते. परंतु मेणबत्ती पूर्णपणे पेटल्यानंतर किंवा जळाल्यानंतर, काही मेण तळाशी द्रव अवस्थेत राहते. मेण घन (solid) असलं तरी ते पेट्रोल आणि केरोसीनप्रमाणेच जळतं. ज्यामुळे ते जळल्यानंतर नाहीसं होतं.


वास्तविक जळणे हा मेणबत्तीमधील रासायनिक बदल आहे. जो ऑक्सिजनच्या उपस्थितीत होतो. या प्रक्रियेत पदार्थ नष्ट होत नाही किंवा निर्माणही होत नाही. फक्त त्याचे स्वरूप बदलते. मेणबत्त्यांच्या बाबतीतही असेच घडते. याला अविनाशीपणाचा नियम (Indestructibility) म्हणतात.


मेणबत्ती कशी जळते किंवा काम करते हे जाणून घेऊ


सहसा आपण मेणबत्ती जळवताना त्याच्यातील धाग्याजवळ आग किंवा जळती वस्तू घेऊन जातो, ज्यामुळे हा धागा पेट घेतो आणि मेणबत्ती जळू लागते. परंतु हे काम कसं करते हे समजून घेऊ.


खरंतर मेणबत्तीतील धागा जळल्यामुळे मेण हळूहळू वितळते. हे वितळलेलं मेण धाग्याला जळण्यास मदत करतं. मेण हा कार्बन आणि हायड्रोजन या घटकांनी बनलेला एक जटिल पदार्थ आहे. त्यामुळे जळण्याच्या प्रक्रियेत, त्याचा कार्बन हवेच्या ऑक्सिजनशी संयोग होऊन कार्बन मोनोऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइडसारखे वायू तयार करतो. जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत.


ते जळत्या मेणबत्तीतून वाफेसारखे बाहेर निघतात. जळत नसलेला काही कार्बन मेणबत्तीतून धूर म्हणून बाहेर पडतो, जो काजळीच्या स्वरूपात गोळा होतो. अशा प्रकारे मेणबत्तीचे मेण जळते आणि कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि काजळीमध्ये बदलतं.


मणबत्तीच्या या गुणधर्मामुळे आपण जर जळत्या मेणबत्तीचे वजन केले तर, त्याचे वजन आपल्याला न जळलेल्या मेणबत्तीच्या वजनापेक्षा थोडे अधिक असेल. पण मग हे कशामुळे होते? असा प्रश्न येथे उपस्थीत होतं. तर हे समजून घ्या की, जळत्या मेणबत्तीचं वजन वाढतं ते ऑक्सिजनमुळे.