एअरफोन, नटबोल्ट अन् बरंच काही...; पोटदुखीने हैराण झालेल्या तरुणाच्या पोटात सापडल्या लोखंडाच्या वस्तू
Trending News In Marathi: एका तरुणाच्या पोटातून लोखंडाच्या वस्तू काढण्यात आल्या आहेत. यात एअरफोन, नटबोल्टसह अनेक पिनसह अनेक वस्तू सामील आहेत.
Trending News Today: एक व्यक्ती गेल्या दोन वर्षांपासून पोटदुखीने त्रस्त होता. अनेक औषधोपचार केले मात्र वेदना वाढतच होता. अखेर या व्यक्तीने रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी जेव्हा त्याला पोटदुखीचे कारण विचारले तेव्हा त्याला सांगताच आले नाही. डॉक्टरांनी जेव्हा एक्स-रे काढला तेव्हा रिपोर्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले. तरुणाच्या पोटात इअरफोन, नट बोल्टसारख्या अनेक वस्तू दिसत होत्या. या वस्तू तरुणाच्या पोटात कशा गेल्या हे मात्र कळू शकलेले नाहीये.
पंजाब राज्यातील मोगा जिल्ह्यातील ही घटना आहे. 3 तासांच्या ऑपरेशननंतर या तरुणाच्या पोटातून इअर फोन, रिटेनर, नट बोल्ट, वॉशर, लॉकेट, स्क्रू आणि अशा डझनभर लोखंडी वस्तू काढण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला गेल्या दोन वर्षांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. बुधवारी हा रुग्ण रुग्णालयात आला होता. पोटदुखी, ताप आणि उलटी सारख्या समस्यांमुळं तो त्रासला होता. पोटदुखीचे नेमके कारण सापडत नसल्यामुळं आम्ही त्याचा एक्स-रे आणि स्कॅन केले. तेव्हा रिपोर्ट पाहून आम्ही सगळेच हादरलो होतो.
डॉक्टर अजमेर कालरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारची केस आली होती. मात्र त्यानंतर सर्व डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करुन तीस तास ऑपरेशन करुन पोटातील सर्व सामान बाहेर काढले आहे. मात्र, बऱ्याच कालावधीपासून पोटात लोखंडाचे सामान असल्यामुळं त्याची प्रकृती अद्याप चिंताजनकच आहे. ऑपरेशन जरी यशस्वी झाले असले तरी या व्यक्तीची प्रकृती अद्याप स्थिर नसल्याचे समोर आले आहे.
या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून त्याला या गोष्टीचा त्रास होत होता. मात्र, तो कोणालाच काही सांगत नव्हता. पोटदुखीचा त्रास इतका तीव्र होत होता की त्याला झोपदेखील नीट येत नव्हती. अनेक डॉक्टरांकडे त्याला नेण्यात आले मात्र, कोणात्याही डॉक्टरांची मात्रा त्याला लागू पडली नाही.
पोटदुखीची वेदना सहन न झाल्यामुळं व सतत ताप येत असल्यामुळं अखेर एका डॉक्टरांकडे त्याला नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. एक्स-रेनंतर जो रिपोर्ट आले त्यात अनेक वस्तू दिसून आल्या. पोटात लोखंडाच्या वस्तू असल्याचे समोर येताच घरातचेही घाबरले. त्यानंतर डॉक्टरांनी मोगा मेडिसिटीमध्ये दाखल होण्यास सांगितले. तिथेच त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आले. मात्र, इतक्या वस्तू त्याने कशा खाल्ल्या व कधी हे मात्र त्याच्या कुटुंबीयांनाही माहिती नाहीये. तसंच, कुटुबींयांच्या सांगण्यावरुन त्यांचा मुलगा मानसिकरित्या देखील त्रासलेले होता.