इथे वर विकणे आहे! `या` राज्यात भरतो वरांचा बाजार
या शहरात उघडपणे अगदी मोठा मेळाव्या घेऊन हुंडा घेतला जातो.
Groom Market : भारतात हुंडा घेणे आणि देणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र आजही गावपातळीवर यागोष्टी सहज घडत आहे. आजही आपण हुंडाबळीच्या बातम्या वाचतो आणि ऐकतो. कारण लोक आपल्या पैशाचा मोह आवरु शकत नाही आहे. भारतात बिहार (Bihar) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हे राज्य हुंडा घेण्यात आघाडीवर आहेत. या शहरात उघडपणे अगदी मोठा मेळाव्या घेऊन हुंडा घेतला जातो. वराच्या उत्पन्नानुसार हुंड्याची (Dowry) रक्कम निश्चित केली जाते. या सोहळ्यासाठी मुलगा आणि मुलगी या दोघांच्याही कुटुंबाची संमती असते.
इथे भरतो वरांचा बाजार
बिहारमध्ये वरांचा बाजार भरला जातो. अगदी बरोबर बिहारमध्ये वरांचा बाजार भरला जातो. या बाजाराला बिहारमध्ये सौरथ सभा असं म्हटलं जातं. ही जगातील सर्वात जुनी विवाह स्थळांपैकी एक आहे. या बाजारात विविध जातीची लोक येतात. या बाजारात आपल्या मुलीसाठी योग्य मॅच शोधला जातो. (trending news india 700 year old groom market of state bihar know the story in marathi)
कुटुंब घेतात निर्णय
ज्या मुलाचा व्यवसाय जितका प्रतिष्ठेचा असतो तितक्या त्याला हुंडा मिळतो. आजच्या लव्ह मॅरेंजच्या (Love Marriage) जमान्यात या मेळाव्याद्वारे अरेंज मॅरेंज (Arranged Marriage) करण्यात येतो. बिहारमधील स्थानिक लोक सांगतात की, पूर्वी या सभेला येण्यासाठी राज्यभरातून बस व्यवस्था असायची. प्रसारमाध्यमांनी या मेळाव्याला एका बाजाराचं नाव दिलं कारण इथे वरांचा गुराप्रमाणे विकला जातो.
बिहारमध्ये अनेक वर्षांची परंपरा
हा मेळाव्या म्हणजे 700 वर्षांची जुनी परंपरा आहे. या मेळाव्यात वर-वधू प्रदर्शनात उभे असतात. या प्रदर्शनद्वारे मुलीचे वडील किंवा भाव वराची निवड करतात. या सगळ्या प्रक्रियेत वधूच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही. आजच्या युगात असाप्रकारे वर-वधूचा मेळावा भरणे कितपत योग्य आहे.