Pension Plan Benefits: आजकाल अनेकांच्या खाजगी नोकऱ्या असतात त्यामुळे निवृत्तीनंतर पेन्शनचं टेन्शन असंख्य लोकांना सतावत असते. तर आपल्या पश्चात घर कसं चालेल या टेन्शनमुळे तुम्ही हैराण आहात. मग आज आम्ही तुमचं हे टेन्शन दूर करणार आहोत. निवृत्तनंतरही तुमच्या हातात पैशा खेळणार आहे. मोदी सरकार तुमच्यासाठी मस्त योजना घेऊन आलं आहे. या योजनेचं नाव आहे अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana). या योजनातर्गंत तुम्ही आणि तुमच्या पत्नीला स्वतंत्र खाते उघडल्यास तुम्हाला दोघांना 10 हजार मासिक पेन्शन मिळेल. 


निवृत्तीनंतर पेन्शनचं टेन्शन गायब!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक ही तुमच्या वयावर अवलंबून आहे. तर या योजनेतर्गंत तुम्हाला 1 हजार, 2 हजार, 3 हजार, 4 हजार आणि 5 हजार मासिक पेन्शन मिळेल. या योजनेतर्गंत तुम्ही दर 6 महिन्यांत केवळ 1239 रुपये गुंतवल्यानंतर सरकार तुम्हाला 60  वर्षांच्या वयानंतर दरमहा 5000 रुपये पेन्शन देतील. तर 1000 रुपयांच्या पेन्शनसाठी 42 रुपये, 2000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी (monthly pension) 84 रुपये, 3000 रुपयांच्या पेन्शनसाठी 126 रुपये आणि 4000 रुपयांच्या पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा तुम्हाला बँकेत जमा करावे लागतील. (trending news invest for a pension of rs 5000 after retirement understand the plan in maratha)


कोणाला मिळणार लाभ ?


18 ते 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतो. तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्याद्वारे अटल पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकता. 



'हे' आहे योजनचे फायदे 


पेमेंटसाठी तुम्हाला 3 ऑप्शन देण्यात आले आहे. Monthly, Quarterly or Half Yearly तुम्ही पैसे जमा करु शकता. तर या योजनेत 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना कर लाभ मिळतो. जर गुंतवणूकदाराचा मृत्यू 60 वर्षांपूर्वी किंवा नंतर झाला तरी पेन्शनचे पैसे पत्नीला मिळतात. जर दुर्दैवाने पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला असेल तर नॉमिनीला पेन्शन देते.