Alert! दोनपेक्षा जास्त बँक अकाऊंट असणाऱ्यांवर संकट, आर्थिक फटका बसण्याची चिन्हं
पण थांबा, 2 पेक्षा जास्त अकाऊंट असल्याचे फायदे असले तरी यामुळे अनेक तोटेही आहेत.
More than 2 bank accounts: जर तुम्हीकडे 2 पेक्षा जास्त बँक अकाउंट असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला आर्थिक नुकसानीसोबतच अनेक समस्यांना पुढे जावं लागणार आहे. अगदी तुम्ही एखाद्या गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेतला तरी ते तुम्हाला एकच अकाउंट ठेवण्याचा सल्ला देतात. तुमच्याकडे UPI आणि अकाउंट जास्त असेल तर तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. याचा अंदाजही तुम्ही लावू शकतं नाही. 1 पेक्षा जास्त बँक अकाऊंट असल्याचे तोटे काय आहेत ते जाणून घेऊयात.
जर तुम्ही लोन, PF किंवा म्युच्युअल फंड घेण्याचा विचार करत असाल. त्याशिवाय मुदत ठेवींसाठी वेगवेगळ्या अकाऊंट उघडण्याचा विचार करत असाल तर अशावेळी काय करायचं यावर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
वेगवेगळ्या ऑफर्सचा लाभ
सध्या मार्केटमध्ये सरकारी बँकांसोबतच अनेक खाजगी बँका आल्या आहेत. त्यामुळे अशावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांकडून अनेक ऑफर्सची घोषणा दिली जाते. व्याजदर, डेबिट कार्ड, विमा, बँक लॉकर लोन असे अनेक प्रकारे ऑफर ग्राहकांना दिले जातात. मग अशा ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या बँकेत अकाऊंट उघडून फायदा घेऊ शकता. याशिवाय ट्रेन किंवा फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी अशा अकाऊंटचा फायदा होतो.
जास्त विमा संरक्षण
RBIच्या गाईडलाइंसनुसार बँकेतील जमा रकमेवर 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. म्हणजे जर तुमची बँक कंगाल होते तर तुम्हाला फक्त ₹500000 परत मिळतील. याचा अर्थ असा की तुमच्या बँक अकाऊंटमध्ये कितीही पैसे असो, तुम्हाला फक्त 5 लाख रुपयेच मिळणार. त्यामुळे तुम्ही विमा करुन तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता.
बँक डेबिट कार्ड
एकापेक्षा जास्त बँकांमध्ये अकाऊंट असल्यास याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. कारण यामुळे तुमच्याकडे अनेक बँकांचे डेबिट कार्ड असतं. यामुळे तुम्ही कुठेही त्या-त्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकता. यासोबतच ट्रान्झॅक्शन चार्जचाही काही संबंध येत नाही.
पण थांबा, 2 पेक्षा जास्त अकाऊंट असल्याचे फायदे असले तरी यामुळे अनेक तोटेही आहेत. त्यामुळे सावधान कुठल्याही बँकेत अकाऊंट उघडण्याआधी या गोष्टी जाणून घ्या.
फसवणूक
जर तुम्ही एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट व्यवस्थित सांभाळू शकत नाही. मग अशावेळी जर पॅन कार्ड किंवा आयडी चोरीला गेल्यास तुमच्या बँक अकाऊंटमधून पैशाची अफरातफरी होऊ शकते.
ITR भरण्यास अडचण
जर तुमच्याकडे 2 पेक्षा जास्त बँक अकाऊंट आहे. यातील प्रत्येक अकाऊंटमधील पैशांचा जर तुम्ही योग्य हिशोब ठेवला नाही. अशावेळी ITR भरताना तुमच्याकडून चुका होतात. या गोष्टीचा तुम्हाला फटका बसतो.
बँकांची शुल्क
प्रत्येक बँकेचे आपले नियम असतात. प्रत्येक बँकेतील अकाऊंटमध्ये किमान पैसे शिल्लक ठेवण्याची अट आहे. त्यामुळे तुमचे 2 ते 3 पेक्षा जास्त अकाऊंट असेल तर त्यात तुमचे भरपूर पैसे गुंतले जातात. अडचणीत तुम्ही तो पैसा वापर करु शकत नाही. शिवाय बँक एसएमएस चार्ज, एटीएम चार्ज, चेक बुक फी असे अनेक फी घेतात. त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये हे अनवाश्यक खर्च जोडला जातो.
पासवर्ड
2 पेक्षा जास्त बँक खाते उघडल्यास तुमच्याकडे तेवढेच डेबिट कार्ड असतात. जेवढे डेबिट कार्ड तेवढे पासवर्ड. अनेकांना सगळे पासवर्ड आणि यूजर आयडी लक्षात राहत नाही. मग अशावेळी तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं.