फिल्मी स्टाइल गँगवॉर! पोलीस आणि बदमाशांमधील चकमकीचा Video व्हायरल
एवढंच नाही तर वर्दळीच्या रस्त्यावर पोलीस फायरिंग (firing) करतानाही दिसत आहे.
Trending News : बॉलिवूडमध्ये गँगवार अनेक चित्रपट तुम्ही पाहिली आहेत. कंपनी, डी डे, ब्लॅक फ्रायडे, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई यासारख्या अनेक चित्रपटात तुम्ही पोलीस आणि आरोपींची चकमक पाहिली आहे. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल (social media) झाला आहे. ज्यात भरदिवसा पोलीस (police) एका गाडीचा पाठलाग करत आहे. एवढंच नाही तर वर्दळीच्या रस्त्यावर पोलीस फायरिंग (firing) करतानाही दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाही वाटेल की एखाद्या चित्रपटाची शुटिंग सुरु आहे. पण हा व्हिडीओ म्हणजे रियल आयुष्यातील पोलीस आणि गुन्हेगाऱ्यांमधील चकमकीचा आहे. हा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (trending news punjab police firing on gangsters car cctv video viral on social media in marathi)
या व्हिडीओमध्ये दोन सीसीटीव्ही फुजेट आहेत. यात तुम्ही पाहू शकता, एका पांढऱ्या कारच्या मागे पोलिसांची गाडी पाठलाग करत आहे. कारमधील बदमाश गाडी जोराने पळवत आहे. अशात रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका स्कूटरवरील महिलेला ही कार धडक देते. ती महिला रस्त्यावर पडते. पण तरीही या कारमधील बदमाश थांब नाहीत.
पुढच्या फूटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही कार तिच्या समोरील आलेल्या मोटारसायकललाही धडक देते. या धडकेमुळे या बाइकवरील माणसं खाली पडतात. तरी हे बदमाश बिलकुल थांबत नाही. पुढे जाऊन एका कारला त्यांची धडक होते. या सगळ्यात पोलीस त्यांचा पाठलाग करत असतात.
तुम्ही पाहू शकता जशी बदमाशांची कार दुसऱ्या कारला धडक देते. तेव्हा पोलीस गाडीतून उडी घेतात आणि त्यांच्या कारच्या टायरवर फायरिंग करतात. अगदी फिल्मी स्टाइलमध्ये पोलीस या गाडीतील बदमाशांना अटक करतात.
या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनवरुन हा व्हिडीओ पंजाबमधील (Punjab)आहे. या कारमध्ये दोन ड्रग्स पैडलर (peddlers) असतात आणि त्यांचावर 10 ग्राम Heroin घेऊन जात होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजबीर आणि मान सिंग असं आरोपींचं नाव आहे.