Russian Girl Wants Indian Groom : एका रशियन मुलीचा (Russian Girls) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मुलीला भारतीय मुलाशी लग्न करायचं आहे. पण होणाऱ्या पतीसमोर या मुलीने काही अटी ठेवल्या आहेत. या मुलीचं नाव नेली नाम असं असून तिला भारतीय संस्कृतीचा (Indian Culture) प्रचंड लगाव आहे. यामुळेच तीने भारतीय मुलाशीच लग्न करण्याचा निश्चय केला. यासाठी ती मुलाच्या शोधात आहे. आपल्याला कसा पती हवा आहे याचा इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram Account) एक व्हिडिओ तीने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियन मुलीने ठेवल्या अटी
भारतीय मुलाशी लग्न करायचं असलं तरी या नेली नामने अनेक अटी ठेवल्या आहेत. पण या अटी ऐकून युजर्स हैराण झाले आहेत. नेलाच्या इन्स्टा प्रोफाईलवरुन ती दुबईत राहात असल्याचं कळतंय. 18 ऑक्टोबरला तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यात ती लग्नासाठी आपण भारतीय मुलाचा शोध घेत असल्याचा म्हणताना दिसतेय. सिंगल मुलांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीह झआले. पण नेलीच्या अटी ऐकून त्यांना धक्का बसला.


व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत नेली होणाऱ्या भारतीय पतीकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे सांगताना दिसतेय. यात ती म्हणतेय 'मुलाची उंची सहा फुटाहून अधिक हवी, त्याचे डोळे हिरवे असायला हवेत, संगीताची आवड हवी आणि नृत्य तर यायलाच हवं. याशिवाय फिरण्याचा छंद असावा'


यापुढे नेली म्हणते 'माझ्यावर तो खूप प्रेम करणारा हवा, याशिवाय रशियावरही त्याचं प्रेम असायला हवं' नेली नामने हा व्हिडिओ 18 ऑक्टोबरला आपल्या इन्स्ट अकाऊंट  @girl_white_indian वरुन शेअर केले आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत अडीच लाखाहून अधिक लोकांनी लाईक केल आहे. तर हजारो युजर्सने कमेंट केली आहे. 



व्हिडिओवर युजर्सच्या प्रतिक्रिया
नेला नामच्या या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट्स आल्या आहेत. एका युजरने म्हटलंय या रशियन मुलीला भारतीय मुलाच्या रुपात  Ben10 हवाय. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय बाकी सर्व ठिक आहे, पण हिरवे डोळे कुठून आणायचे. तर आणखी एका युजरने म्हटलंय ही मुलीला ऋतीक रोशनशी लग्न करायचं आहे.