Woman Constable Viral News : लग्न, संसार आणि मुलांना सांभाळ शिक्षण आणि करिअर करायचं म्हणजे महिलांची तारेवरची कसरत असते. अशावेळी घरातील किंवा आजूबाजूची लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तिच्या मदतीला धावून जातात. अशी एक आई...एकीकडे तिची परीक्षा आणि दुसरीकडे 6 महिन्यांचं तान्हुल बाळ...पेपर देण्याची वेळ झाली आणि बाळ रडत होतं. आता तिच्या मनाचा गोंधळ उडाला होता. द्विधा मनस्थिती असताना समोर ती आली अन् तिच्या आयुष्यातील परीक्षा देण्यासाठी ती क्लासरुममध्ये गेली. (trending news Woman constable takes care of baby mother writes exam photo viral on Social media google trend now )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो ती दुसरी तिसरी कोणी नसून परीक्षा केंद्रावरील महिला पोलीस कॉन्स्टेबल होती. गुजरात उच्च न्यायालयातील शिपाई भरती परीक्षेच्या वेळीची ही घटना...एक महिला आपल्या मुलाला घेऊन परीक्षा देण्यासाठी आली होती. मुलं सतत रडत होतं,  आता काय करणार असा प्रश्न महिलेला पडला असताना तेवढ्यात एक लेडी कॉन्स्टेबल तिथे आली. तिने त्या तान्हुल्याला आपल्या जवळ घेतलं आणि त्या लेकराची आई परीक्षेसाठी गेली. (gujarat woman constable)


अहमदाबाद पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्या महिला पोलीस कॉन्स्टेबल दया बेन आणि चिमुकल्याचे फोटो शेअर केले. त्यानंतर सोशल मीडियावर या महिला पोलीस कॉन्स्टेबलचं तोंडभरुन कौतुक सुरु आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता तो चिमुकल्या त्या महिलेसोबत आनंदात खेळताना दिसतं आहे. 


या लेडी कॉन्स्टेबलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यूजर्स तिचं कौतुक करताना थांबत नाही आहे. 



'आम्हाला तुमचा अभिमान आहे मॅडम', असं एका यूजर्सने लिहिलं आहे. दुसरा म्हणतो की, 'दयाबेन या महिला पोलीस कॉन्स्टेबलने आज आईची भूमिका साकारत खऱ्या अर्थाने परीक्षा देणाऱ्या आईला मदत केली आहे. या लेडी कॉन्स्टेबलच्या मदतीमुळे ती आई शांतपणे आपली परीक्षा देऊ शकली.