प्रत्यक्षात कसा दिसतो शनी ग्रह? चंद्र आणि शनीचा फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित
Saturn Moon Viral Photo : इन्स्टाग्राम चंद्र आणि शनी प्रत्यक्षात कसे दिसतात हे दाखविणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Trending photo : नासा (National Aeronautics and Space Administration) अनेकदा अंतराळातील आश्चर्यकारक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. इस्त्रोने चांद्रयान 3 चं यशस्वी (Chandrayaan 3) प्रक्षेपण केलं आहे. अवकाशातील ग्रह प्रत्यक्षात कसे दिसतात हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. शनी आणि चंद्र प्रत्यक्षात कसा दिसतो हे दाखविणारे फोटो नासाने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. (trending photo nasa captures saturn and moon shani viral on Internet)
अंतराळातील चंद्र आण शनि हे सुंदर फोटो पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होणार यात शंका नाही. NASA त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांनी हे फोटो शेअर केले आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता शनी ग्रहाचा एक भाग, त्याचं वलय दिसतंय. सोबतच काही अंतरावर चंद्रही दिसतोय. कॅसिनी अंतराळयाने हे फोटो घेतले आहेत. सुमारे 576,000 मैल (927,000 किमी.) वरून हे फोटो घेण्यात आले आहेत. वायमंडल, चुंबकीय क्षेत्र, चंद्र आणि वलयांचा अभ्यास करताना हा फोटो काढण्यात आला आहे.
हा फोटो शेअर करताना NASA ने लिहिलं आहे की, 'शनीच्या रिंग एका कोनात दिसतात, तर ग्रहाच्या पिवळ्या पृष्ठभागावर एक पातळ रेषा तयार झाली आहे, आणि वरच्या उजवीकडे अंतराळाच्या काळेपणाकडे पसरतात. रिंगच्या खाली, चंद्र मिमास ग्रहाच्या जवळ एक लहान बिंदूसारखा दिसतोय.'
हा फोटो शेअर केल्यापासून तो सोशल मीडियावर व्हायरल तर झालाच आहे. सध्या तो इंटरनेटवर आज ट्रेंडिंगदेखील झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 8.21 लाखांहून अधिक लाइक मिळाले आहेत. तर 2 हजारापेक्षात जास्त लोकांनी त्यावर कंमेट्स केले आहेत.
शनी ग्रह म्हणजे ज्योतिषशास्त्रातील शनिदेव चंद्रासमोर किती मोठा दिसतोय हे दाखविणारा हा अतिशय सुंदर असं चित्र पाहून नेटकरी भारावले आहेत.