Train Accident Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही घटना इतक्या विदारक असतात की, पाहतानाच अंगावर काटा येतो. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (Railway Accident Video) पाहताना डोळे मिटून घेण्याची वेळ येते. असं कोणासोबतच होऊ नये, अशी पाहण्याऱ्याची भावना असते. रेल्वे ट्रॅक क्रॉस (Railway Track Crossing) करू नका, त्याऐवजी ब्रिजचा वापर करा अशा सूचना प्रशासन देतं. मात्र अनेक जण त्याकडे कानाडोळा करून घाईघाईने रेल्वे क्रॉस करतात. कधी कधी हा शॉर्टकट जीवावर बेततो. असाच एक रेल्वे अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दैव बलवत्तर होतं म्हणून प्रवाशाचा जीव वाचला असंच तुम्ही व्हिडीओ पाहिल्यावर म्हणाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती घाईघाईने रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसत आहे. रुळ ओलांडू नये म्हणून मधोमध टाकलेला बॅरिकेड  ओलांडतो आणि दुसऱ्या ट्रॅकवर येतो. इतक्यात त्याच्या पायातील बूट रेल्वे ट्रॅकवर निघतो. तो बूट घेण्यासाठी जीवाची पर्वा न करता मागे फिरतो. बूट उचलतो आणि रेल्वे येत असल्याने ट्रॅकच्या त्या कडेला उभा राहतो. ट्रेन थोडी दूर असल्याचं पाहून तिथेच न थांबता पुन्हा रेल्वे ट्रॅक ओलांडायचा प्रयत्न करतो. मृत्यू समोर असतानाही रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असल्याने प्लॅटफॉर्मवरून पोलीस त्याला ओरडतो. तसं करू नको सांगत असताना ट्रॅक ओलांडतो. 



Station Name: पिवळ्या बोर्डवर काळ्या रंगात का लिहितात रेल्वे स्टेशनची नावं? जाणून घ्या या मागचं कारण


मोटारमन या प्रसंगात इमर्जन्सी ब्रेक मारतो. प्लॅटफॉर्मवरील पोलीस त्याला हात देऊन खेचतो आणि एक फटका देतो. हा प्रसंग पाहताना प्लॅटफॉर्मवरील प्रवासी घाबरून जातात. 22 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेक युजर्सनी या व्हिडीओखाली कमेंट्स दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "एक कानाखाली माझ्याकडून पण द्या." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "पोलीस एक कानाखाली मारून थांबला मी असतो तर..."