Clay Pot For Cooking :  नैसर्गिक थंड पाण्यासाठी मातीचा माठ हा सर्रास सगळीकडे आपल्याला पाहिला मिळतो. गेल्या काही वर्षांपासून किचनमधील भांड्याचे ट्रेंड बदला आहे. नॉनस्टीक भांड्यासोबत (Nonstick) आज काल अनेक घरांमध्ये तांब्याची (copper) आणि मातीची भांडी दिसायला लागली आहे. तांब्याचा आणि मातीच्या भांड्यातील जेवण आरोग्यासाठी चांगलं असते. त्यामुळे गृहिणी जास्त जास्त या भांड्या वापर करत आहेत. शिवाय मातीच्या भांड्यामधील (Clay Handi) पदार्थांची चवही स्वादिष्ट असते. या भांड्यातील वांग्याचं भरीत पासून चिकन, मटणची ग्रेव्ही एक नंबर लागते. पण ही भांडी वापरत असताना अनेकांना ती स्वयंपाक योग्य कशी करायची. शिवाय ती स्वच्छ कशी करायची हे माहिती नाही. त्यामुळे त्यांची भांडी लवकर खराब होतात आणि ती लवकरात लवकर फुटतात. (trending reel video How To Use Clay Pot or Handi Cooking First Time and clean tricks and clay handi for cooking benefits maratin news)



स्वयंपाक योग्य कशी करायची?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. भांडी आणल्यानंतर ती 1 दिवस पाण्यात पूर्ण बुडवून ठेवावी. 
2. चोवीस तास बुडवून झाल्यावर, ती भांडी नुसती scrub ने नीट घासून घ्या. 
3. त्यानंतर ती उन्हामध्ये ठेवून सुकवून घ्या.
4. पाणी सुकल्यानंतर त्या भांड्यांना तेल लावून परत उन्हामध्ये ठेवून द्या.
5. जेव्हा हे भांडे पूर्णपणे कोरड होईल म्हणजे ती स्वयंपाकासाठी तयार आहेत. 


भांडी चुटकीसरशी स्वच्छ करण्यासाठी ट्रिक्स


1. मातीच्या भांड्यांमधील अन्नाचा वास आणि तेल निघावं म्हणून ती गरम पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर ती स्वच्छ धुवून घ्या. 
2. मातीचं भांडं अनेकवेळा धुतल्यानंतरही त्यात अन्नाचा वास येत राहतो. यासाठी मातीच्या भांड्यात गरम पाणी टाका. आता त्यात 3 चमचे बेकिंग सोडा टाकून ते अर्ध्या तास ठेवून द्यावे. त्यानंतर हे भांडं स्वच्छ पाण्याने धुवा.
3. मीठ हे सर्वोत्कृष्ट नॉन टॉक्सिक क्लिनर मानलं जातं. त्यामुळे हे मातीच्या भांड्यांची घाण साफ करण्यासाठी आणि बॅक्टेरिया मुक्त करण्यासाठी उपयुक्त आहे. 
4. मातीची भांडी साफ करण्यासाठी साबण कधीही वापरू नका. मातीची भांडी साबण सहज शोषून घेतात. 


काही महत्वाच्या टिप्स 


1. मातीची भांडी घेताना त्याचा तळ/बुड बघावा. तो जाड हवा, नाहीतर उष्णतेने भांडे तडकू शकते.
2. नवीन भांडे कधीही गॅसवर तेल घालूनच गरम करायचे. आधी गरम करू नये. ती फुटू शकतात. सुरुवातीला मंद आचेवर ठेवा.
3. स्वयंपाक झाला की गरम पाणी ओतून स्वच्छ करावी. तेलाचा तवंग, अन्नकण निघून येतात.
4. भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबाची साल , मीठ , व्हिनेगर वापरू शकता.
5. मातीच्या भांड्यांसाठी वेगळा स्क्रब किंवा स्पंज ठेवा.
6. भांडी धुवून झाल्यावर शक्य असेल तर उन्हामध्ये सुकवून घ्या.



मातीच्या भांड्यात जेवण करण्याचे फायदे


मातीच्या भांड्यात जेवण केल्यास त्या पदार्थांतील 100 टक्के सूक्ष्म पोषक घटक कायम राहतात असं तज्ज्ञांचं म्हणं आहे. शिवाय पदार्थातील कॅल्शियम (Calcium), फॉस्फरस (Phosphorus), लोह (Iron), मॅग्नेशियम (Magnesium) घटकही कायम राहतात. मातीच्या भांड्यातील जेवण केल्यास गॅस, बद्धकोष्ठची समस्या दूर होते आणि  हृदय निरोगी राहण्यास मदत होते. या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना तेल कमी लागतं. त्यामुळे Cholesterol नियंत्रणात राहतं.