Trending News :  शिक्षण हे आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. आपण काय शिकतो त्यावर आपलं भविष्य अवलंबून असतं. IITमध्ये शिकणं हे आजच्या पिढीतील अनेक मुलांचं स्वप्न आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित IIT संस्थेतून शिक्षण घेतल्यास नोकरी पक्की असं म्हणतात. IIT परीक्षा ही खूप कठीण असते. त्यामुळे ही परीक्षा प्रत्येक जण पास होऊ शकत नाही. या परीक्षेसाठी मुलं अनेक महिने खूप मेहनत करत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्हाला माहिती आहे का?, जसं पुणे हे विद्येचं माहेरघर आहे तसंच भारतात ''IIT गाव'' अशी ओळख असणारं एक गाव आहे. कारण या गावातील प्रत्येक घरातून मुलं IITमध्ये निवडले जातात. जवळपास 1996 पासून या गावात प्रत्येक घरात IIT विद्यार्थी आहे. 


कसा घडला हा चमत्कार?



गावात IITसाठी मुलांना तयार करण्यासाठी एक वाचणालय आहे. विशेष म्हणजे ही लायब्ररी तरुणांकडून चालवली जाते. त्यामुळे ही लायब्ररी मुलांकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं नाही. एक अजून खास गोष्ट म्हणजे जी मुलं IIT मध्ये शिकून आली आहेत किंवा शिकत आहेत ती मुलं भावी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देतात. त्यामुळे भावी विद्यार्थ्यांना ही परीक्षा थोडी सोपी होऊन जाते आणि हेच कारण आहे की, दरवर्षी आईआईटी परीक्षेत या गावातील मुलांची कामगिरी जबरदस्त असतं. तसंच अनेक मुलं निवडलीसुद्धा जातात. त्यामुळे या गावाची ओळख ''IIT गाव'' म्हणून झाली आहे. 



काय आहे 'या' गावाचं नाव?



बिहारमधील गया जिल्ह्यातील पटवाटोली असं या गावाचं नाव आहे. या IIT गावातून दरवर्षी एक डझनपेक्षा जास्त मुलं आईआईटी परीक्षा पास करतात. या मुलांना भारतातील प्रतिष्ठित संस्थेत शिकण्याची संधी मिळते.