VIDEO : साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच Anant Ambani आणि Radhika Merchant दिसले एकत्र, राधिकाने वेधलं लक्ष
Anant Ambani and Radhika Merchant : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं.
Anant Ambani and Radhika Merchant at Tirumala Tirupati : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा साखरपुडा राधिका मर्चेंट सोबत मोठ्या थाट्यामाट्यात साजरा झाला. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या सुनचं स्वागत अंबानी कुटुंबात (anant ambani and radhika merchant engagement) करण्यात आलं. या साखरपुड्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर आजही पाहिले जातं आहे. साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट एकत्र दिसले. भावी पत्नीसोबत अनंत अंबानी देवदर्शनाला गेले होते. (Tirupati News)
बालाजी चरणी नतमस्तक!
वसंत पंचमीचा मुहूर्तावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांनी तिरुमला तिरुपतीला जाऊन बालाजी चरणी नतमस्तक झाले. यावेळी अनंत अंबानी पांढरं शुभ्र धोतर तर राधिका अगदी साधी सलवार कुर्तामध्ये दिसून आली. अंबानी कुटुंब जे जगातील श्रीमंत यादीत ज्यांचं नाव घेतलं जातं. त्या घराण्याची सून राधिका मर्चेंट यावेळी अगदी साध्या सलवार कुर्ता दिसल्याने त्याचा साधेपणामुळे नेटकरी कौतुक करतं आहेत. (trending video anant ambani and radhika merchant at Tirumala Tirupati viral on Social media)
आयुष्याची नवीन सुरुवात करताना या जोडप्याने बालाजीचरणी नतमस्तक होतं आशीवार्द घेतले. 19 जानेवारीला साखरपुडा झाल्यानंतर अंबानी कुटुंबातील या नव्या जोडप्याने तिरुपतीला जाऊन लोकांचं लक्ष वेधलं. परंपरा आणि रीतिरिवाजासाठी अंबानी कुटुंब जग जाहीर आहेत. त्यांनी आपली संस्कृती जपली आहे.
अशातच नवीन पिढीदेखील त्या पाऊलावर पाऊल ठेवतं आहे. या सगळ्यांमध्ये सारखपुड्यातील राधिकाचा लूक आणि तिरुपती दर्शनासाठी आलेली राधिका पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. तिचं ते स्मित हास्य, तिचे डोळे आणि आता तिचा हा साधेपणा नेटकऱ्यांना भावतोय.