Trending Video : सोशल मीडियावर (Social Media) हजारो कॉमेडी व्हिडीओचं (Comedy video) आपल्याला रोज पाहिला मिळतात. काही व्हिडीओ पाहून तर आपला दिवसभराचा थकवा नाहीसा होतो. तर काही व्हिडीओ आपल्याला खूप हसवतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून आपल्याला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची  (King of Bollywood Shah Rukh Khan)आठवण होते. 


अरे हा तर DDLJ चा राज...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, एक महिला प्रवासी  (Passenger) तिच्या घरातील काही सामान विसरली होती. हे सामान ऑर्डर करण्यासाठी त्याने Dunzo नावाचं अॅप वापरलं. तेच पार्सल महिलेपर्यंत  पोहोचवण्यासाठी डिलीवरी बॉय (Delivery boy) रेल्वे स्टेशनवर (Railway Station) पोहोचतो. पहिले, सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत असलेला हा मजेदार व्हिडिओ तुम्ही देखील पाहा. (Trending Video delivery boy helping woman ddlj scene video viral on social media nm)



बघितलं, अवघ्या 7 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की डिलिव्हरी एजंट महिलेला पार्सल (parcel) देण्यासाठी जीवाची बाजी लावतो. डिलिव्हरी बॉय शक्य तितक्या वेगाने धावतो आणि शेवटी त्या महिलेला ते पार्सल देतो. हा व्हिडिओ पाहून काहींना 'भाग मिल्खा भाग' (Bhaag Milkha Bhaag) तर काही यूजर्सना 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) चित्रपटाची आठवण होते. 


व्हिडिओने जिंकलं युजर्सचं मन 


हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर  (Twitter) शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत लाखो वेळा पाहण्यात आला आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. काहींनी या मुलाचे कौतुक केले तर काहींनी उदरनिर्वाह करणे खरोखरच खूप अवघड काम असल्याचं सांगितलं.