Trending Video : सर्वसामान्याचा सकाळी ब्रेकफास्टमध्ये (Breakfast) चहासोबत टोस्ट (bread toast) हा आवडीचा पदार्थ...भारतात मोठ्या प्रमाणात टोस्टप्रेमी आपल्याला सापडतील. चहाच्या टपरीवर तर हमखास चहासोबत (tea) टोस्ट खाणारे तुम्ही पाहिलेच असाल...कदाचित त्यापैकी तुम्ही एक असाल...काही वर्षांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला होता ज्यात टोस्ट बनविणारा एक व्यक्ती त्या टोस्टला चाटून पॅक करताना दिसत होता. हा किळसवाणा प्रकार पाहून सर्वांना धक्का बसला होता. आजही जर कोणी टोस्ट खात असाल तर अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आयुष्यात टोस्ट खाणार नाही. 


भयानक!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो, कारण या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कामगाराचं कृत्य पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये कामगार जमिनीवर टोस्टसाठी पीठ मिळताना दिसतं आहे. एवढंच नाही तर तो हे पीठ पायाने तुडवत आहे. त्या कामगाराचे हे डर्टी कृत्य एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या व्यक्तीने त्याला कामगारा जाब विचारल्यावर मुजोरी करताना दिसतं आहे.  हा व्हिडीओ पाहून तुमच्याही तळमस्तकातील आग डोक्यात जाते. हा संतापजनक प्रकार दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Trending Video Eating toast with tea for breakfast you will stop eating toast after seeing  worker uses feet to make dough in bakery viral on social media)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Akash Sharma (@gamerkebaap)


डर्टी टोस्ट!


हा व्हिडीओ (Instagram video) इन्स्टाग्रामवर gamerkebaap या यूजर्सच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी कामगारावर कारवाईची मागणी केली आहे. हे असे प्रकार पाहून म्हणून लोक कुठल्या साध्या दुकानातून रस्त्यावरून अन्नपदार्थ खायला घाबरतात. मोठ्या दुकानात जास्त पैसे घेत असले तरी स्वच्छ आणि आरोग्यासाठी चांगलं पदार्थ मिळतात.