Trending Video : भारतात (India news) सध्या लग्न सराईचे दिवस (Wedding day) सुरु आहे. लग्नात आपण अनेकांना निमंत्रण देतो. जर एखाद्या व्यक्तीला आपण निमंत्रण दिलं नाही तर असा एखादा पाहुण्या लग्नात आला तर. त्याला पाहुण्याला कसा पाहुणचार (Hospitality) दिला जातो. या घटनाचे अनेक व्हिडिओ (video viral) आपण पाहिले आहेत. काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलं होतं एक विद्यार्थी न बोलवता लग्नात (marriage video) गेला आणि मग त्या तरुणाकडून वऱ्हाडींचे भांडे धुण्याची वेळ आली. त्याला असं लग्नात न बोलवता येण्याची शिक्षा देण्यात आली. फुकटंच जेवण जेवण्यासाठी अनेक जण लग्न समारंभात घुसतात. तर त्यांना कोणी ओळखलं नाही तर त्यांचा दिवस बनतो त्यांचे पोट भरतं. पण जर ते पकडल्या गेले तर त्याला चांगलाच समाचार घेतला जातो. 


परदेशी पाहुणे जेव्हा लग्नात येतात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडिओ सगळ्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. हे युरोपचे जोडपे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. हे जोडप एका लग्नात न बोलवता पोहोचलं. त्यानंतर त्यांना जी वागणूक देण्यात आली याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. फिलिप मिक आणि मोनिका चेरवेन्कोवा (Philip Mick and Monika Chervenkova) हे युरोपियन जोडप (European couple) आगरामधील (Agra news) एका लग्नात गेले. त्यांना या लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. या लग्नात फिलिपने शेरवानी तर मोनिकाने साडी नेसली होती. तिने लग्नात सहभागी होण्यासाठी खास मेकअप केला होता. हे दोघे लग्नाच्या वरातीतही मोठ्या उत्साहाने नाचले.


हे परदेशी जोडप जगभरात फिरतं आणि ठिकठिकाणचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतं. त्यांनी या लग्नाचा व्हिडिओही यूट्यूबवर (YouTube video) शेअर केला. हे जोडप म्हणालं की, या भारतीय कुटुंबाने (Indian family) आम्हाला त्याचा घरातील सदस्यासारखं प्रेम दिलं. या लग्नात त्यांनी प्रत्येक रीतिरिवाजचा अनुभव घेतला. जेवणाचा आस्वाद घेतला.  वधूवरासोबत (bride groom video) फोटोही काढले. (Trending Video european couple attended random indian marriage in agra  viral on Social media)



त्यांना या लग्नात एकच खंत वाटली ती म्हणजे लग्नात मांसाहार आणि दारु नव्हती. मात्र आमंत्रण नसतानाही त्यांना लग्नात एवढा मानपान मिळाला याबद्दल त्यांना खूप आनंद झाला. या व्हिडिओच्या शेवटी हे जोडप म्हणालं की, भारतात पु्न्हा एकदा कुठल्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहता आला तर आम्हाला नक्की आवडेल. 



या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळतं आहे. या जोडप्याचं कौतुक होतं असून भारतीय संस्कृतीही कौतुक होतं आहे. भारतीय पाहुण्याचं स्वागत कायम मनापासून करतात असंही यूजर्स म्हणाले.