कडक उन्हात तेल तापताच तरुणीने तळले मासे, VIDEO VIRAL होताच नेटकऱ्यांनी अशी पकडली चोरी
Viral Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी दावा करताना दिसत आहे की उष्णता इतकी जास्त आहे की अन्न शिजवण्यासाठी गॅसवर तेल लावण्याची गरज नाही, ते उन्हामुळे गरम केले जात आहे. उर्मी असे या मुलीचे नाव आहे.
Trending Video : सोशल मीडिया सेकंद सेकंदाला व्हिडीओ व्हायरल होत असतात. खरं तर हा जमान्या रिल्स आणि व्हिडीओचा आहे असंच म्हणायला हवं. आपल्या आजूबाजूला काय सुरु आहे, कुठलं गाणं, कुठलं गोष्ट ट्रेडिंगमध्ये आहे हे हेरुन यूजर्स रील्स आणि व्हिडीओ बनवत असतात. त्यात आपलं कौशल्य वापरून सोशल मीडियावर राहणाऱ्या लोकांना ते मग्न करत असतात. त्या रील्समधून जास्त जास्त लाइक्स, व्ह्यूज आणि व्हायरल कसं होता येईल हे ते पाहत असतात. सध्या सूर्यदेवाच्या प्रकोपाने सर्वसामान्य त्रस्त आहे. प्रचंड उष्णता वाढली असून घराबाहेर पडणं अनेक ठिकाणी कठीण झालंय. हीच गोष्ट पाहून एका तरुणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर सर्वत्र या व्हिडीओची चर्चा सुरु आहे. (Trending Video girl frying fish in the heat of sun video viral netizens caught mistake)
खरं तर या तरुणीचा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये तिने केलेल्या कृत्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. आता हा व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा यात किती सत्य आहे आणि किती फेक. पण काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून प्रश्न निर्माण केले आहेत.
काय आहे नेमकं या व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये रेल्वे ट्रकच्या बाजूला एक तरुणी बसलेली दिसत आहे. तिथे एका सिमेंटच्या कठड्यावर फ्राईंग पॅनमध्ये तेल दिसतंय. ती तरुणी एक मासा घेऊन येते आणि त्या फ्राईंग पॅनमध्ये टाकते. तर काय ते तेल इतकं गरम आहे, की तो मासा फडफडायला लागतो. आता गॅस नाही की चुल पण नाही, मग फ्राईंग पॅनमधील तेल इतकं गरम कसं. तर शहरातील सूर्य एवढा आग ओकतोय की, फ्राईंग पॅनमधील तेल कडक गरम झालंय. या गरम तेलात मासे तळले जात आहे. या तरुणीच नाव उर्मी असून ती बंगाली बोलताना दिसत आहे. म्हणजे हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील कुठल्या शहरातील असू शकतो. पण झी24 तास या व्हिडीओची कुठलही पुष्टी करत नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील फूडीसुमन1 या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओला 166,079 likes मिळाले आहेत. तर या व्हिडीओवर कमेंट बॉक्समध्ये मजेदार कमेंट येत आहेत. एका यूजरने प्रश्न विचारला आहे की, 'जर सूर्य एवढी आग ओकतोय तर ती मुलगी सिमेंटच्या कठड्यावर कशी बसू शकली.'