Viral Video : भारतीय संगीताचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये भारतीय सैनिक आणि पाकिस्तानी सैनिक भांगडा करताना दिसत आहे. हा व्हिडीओ भारत पाकिस्तान सीमेवरील आहे. पाकिस्तानमध्ये  लावलेल्या गाण्यावर भारतीय सैन्य थिरकताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये
पाकिस्तानच्या सैनिकांनी स्पीकरवर दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला यांच गाणं लावलं होतं. पाकिस्तानचे सैनिक भांगडा करत होते तर दुसरीकडे भारतीय सैन्याचे जवानही गाण्यावर थिरकताना दिसले. भारतीय जवानांनी त्यांच्या डान्सचा व्हिडीओ बनवला आहे. सिद्धू मुसेवालाचे बंबीहा बोले गाणं लावलं होतं. 



भारतीय जवानांनी आपल्या चौकीवरून पाकिस्तानच्या चौकीचा व्हिडीओ शूट केला. भारतीय जवान नाचू लागल्यावर त्यांना पाकिस्तानचे सैनिक हातवारे करून दाद देत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यावर सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 


भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. सीमेवर गोळीबारामध्ये सैनिकांना आपला जीव गमवावा लागतो. जसं व्हिडीओमध्ये ज्याप्रकारे खेळीमेळीचं वातावरण आहे तसच देशांमध्ये व्हायला हवं.