Trending Marriage Video : भारतातील वेगवेगळ्या (Indian Marriage) राज्यात अनेक चालीरीती आपल्याला पाहिला मिळतात. विवाह सोहळ्याबद्दल (wedding ceremonies) ही राज्यानुसार वेगवेगळी प्रथा आणि परंपरा आहे. महाराष्ट्रीय (Maharashtrian wedding), पंजाबी आणि ख्रिश्चन विवाह सोहळा आपण पाहिला आहे. वधू वराचा मिलनाचा उत्सव हा अख्ख कुटुंब साजरा करतो. पण तुम्ही कधी मृतांचा विवाह सोहळा पाहिला आहे का? सोशल मीडियावर या अनोखा विवाह सोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. 


मृत्यूच्या 30 वर्षांनंतरही थाटामाटात 'लग्न'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लग्न मोठ्या थाटामाटात संपन्न होतं आहे.  या लग्नाचं वैशिष्ट्यं म्हणजे मृत्यूच्या 30 वर्षांनंतरही थाटामाटात लग्न लावण्यात येतं आहे. तुम्हाला ऐकून आणि पाहून जरा गंमतीशीर वाटेल. पण या लग्नातील विधी पूर्णपणे कोणत्याही सामान्य लग्नासारखे असतात. वराती, दोन्हीकडील पाहुणे, लग्नाचे विधी अगदी गोडाचं जेवणसुद्धा असतं.  मृत्यूच्या 30 वर्षांनंतर हे लग्न कोणाचं आहे आणि का लावलं हे लग्न? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. (trending video Man Woman Get Married In Karnataka 30 Years After Their Death viral on Social media)



'प्रेथा कल्याणम' प्रथा 


कर्नाटक (Karnataka) आणि केरळमध्ये (Kerala) प्रेथा कल्याणम' (Pretha Kalayanam) नावाची ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. जन्माच्या वेळी मृत्यू आलेल्यांसाठी हा विवाह सोहळ्याचा विधी करण्याची या राज्यांमध्ये परंपरा आहे. हा विवाह सोहळा म्हणजे आत्म्याच्या सन्मान करणे, असं कर्नाटक आणि केरळमधील स्थानिक लोक मानतात. 


वधू-वरांऐवजी 'यांचं' होतं लग्न 


'प्रेथा कल्याणम' हा एक मृतांचा विवाह आहे हे तुम्हाला कळलं असेल. तर या व्हिडीओमधील विवाह कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील शोभा आणि चंदप्पा यांचा विवाह आहे. या दोघांचा जन्माच्या वेळीच मृत्यू झाला होता. आज 30 वर्षांनंतर सगळ्या विधी आणि परंपरेने त्यांचा विवाह सोहळ्या मोठ्या थाट्यात पार पडला. हा विवाह सोहळा म्हणजे दोन पुतळ्याचं विवाह असतो. 



अनोख्या विवाह सोहळा शेअर


यूट्यूबर अनी अरुण (AnnyArun) या यूजरने हा व्हिडीओ ट्विटरवर 28 जुलै 2022 ला शेअर केला आहे. आता तो व्हिडीओ पुन्हा अनी अरुण यांनी आपल्या पेजवर पीन केल्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या