Trending Video : कुत्रा आणि सापाची फ्री स्टाईल, शेवट पाहून तुम्हीही हादराल...
हा साप पक्ष्यांवर तुटून पडणारच होता इतक्यात समोरून कुत्र्याने धाव घेतली आणि , सापावर तुटून पडला .मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने सापावर झडप मारली.
viral trending video: प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) खूप पाहिले जातात बरेचदा, प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही वेळा शिकारीचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असतं, बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात, तर कधी मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात.
असतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओना खूप प्रसिद्धी मिळते. असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ (viral video) पाहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.
कुत्रा हा प्राणी अतिशय प्रामाणिक प्राणी म्हणून त्याची ओळख आहे. कुत्रा हा पाळीव प्राणी माणसांसोबत खूप लवकर माणसाळतो.अतिशय इमाने इतबारी आपल्या मालकासोबत राहतो वेळप्रसंगी आपल्या मालकांसाठी कुणाहीसोबत भिडतो एकूणच काय तो त्याची प्रामाणिकता वेळोवेळी दाखवत असतो.
कुत्रा प्राणी अतिशय प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो. मालकांसाठी जीव देणारे अनेक श्वान आपण पाहिलेत, अनेक उदाहरणं आपण ऐकली आहेत. पण आज जो व्हिडीओ (viral video) समोर येत आहे तो पाहून आपला आपल्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाहीये.
सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral video) होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, पक्षी ठेवण्याचा एक पिंजरा आहे ज्यात बरेच पक्षिठेवण्यात आले आहेत आणि त्यांची राखण करण्यासाठी एक श्वान तिथे उभा आहे. एवढ्यात त्या पिंजऱ्यामध्ये एक
भलामोठा साप शिरतो आणि मग काय, सर्व पक्षी फार घाबरून जातात. हा साप पक्ष्यांवर तुटून पडणारच होता इतक्यात समोरून कुत्र्याने धाव घेतली आणि , सापावर तुटून पडला .मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्याने सापावर झडप मारली. एरव्ही साप म्हटलं की, सर्वानाच
घाम फुटतो. चुकूनही आपण सापाच्या नादी लागत नाही. पण या कुत्र्याचं करावं तितकं कौतुक खरच कमी आहे. (trending video of snake and dog fight)
ही झटापट बराच वेळ चालू होती . साप त्या कुत्र्याला चावे घेत होता. या लढाईत कोण जिंकलणार हे पाहण्याची उत्सुकता वाढत चाली असतानाच कुत्रा अखेरचा एक फटका मारतो आणि साप गतप्राण होतो . सापाला मारून त्याने पक्षांचं तर रक्षण केलंच शिवाय सोशल मीडियावर फेमसही झाला.