मुंबई : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडीओ लोकांना काहीतरी शिकवतात, तर काही त्यांना भावूक करतात. त्याचबरोबर असे काही व्हिडीओ येथे आपल्याला पाहायला मिळतात, जे आपल्याला पोट धरुन हसायला भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूपच ट्रेंड होत आहे. जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. एवढंच काय तर काही काळासाठी तुम्हाला नक्की काय चाललंय हे कळणार देखील नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, नववधूच्या भांगेत कोणी दुसराच व्यक्ती सिंदूर भरुन तिला घेऊन जातो.


दुसऱ्या व्यक्तीने वधूची भांग 5 वेळा भरली


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लग्नाचा सोहळा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मंचावर वधू-वर बसले आहेत. वराचे वय खूप जास्त आहे, तर वधूचे वय खूप कमी असल्याचे लक्षात येत आहे. वधू शांतपणे तेथे बाजूला बसलेली असते.  तेव्हा नवरदेव दुसऱ्या महिलेशी बोलण्यात व्यस्त असतो, तेव्हा एक तिसरा व्यक्ती येतो आणि तो नववधूच्या डोक्यात सिंदूर भरतो आणि तिला घेऊन स्टेजच्या मागून निघून जातो. आश्चर्याची गोष्ट अशी की, हे सगळं होत असताना नवरदेवाला यासगळ्या घटनेबद्दल जराही शंका येत नाही.


हा व्हिडीओ shitty.humours नावाच्या अकाउंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. ज्याला शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं की, ''याला म्हणतात मोक्यावर चौका मारनं...''


हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. परंतु हा व्हिडीओ पाहाताना असे लक्षात येत आहे की, हा व्हिडीओ मुद्दाम तयार केला गेला आहे. कारण लग्नात इतकी माणसं उपस्थीत असताना हे सगळं घडू शकलं, जे अशक्यच आहे. असे असले तरी या व्हिडीचं सत्य अजून उघड झालेलं नाही.