Video: तरुणीला गाडीतून पळवून नेलं आणि त्यानंतर आला `तो` Video समोर
Trending Crime News : सोशल मीडिया एक सीसीटीव्ही फुटेज खूप व्हायरल होतो आहे. या फुटेजमध्ये एका तरुणीला त्याचा वडिलांसमोर जबरदस्तीने गाडीतून पळवून नेताना दिसतं आहे.
Telangana Viral Video : सोशल मीडियाचं (Social media) जग खूप छोटं आहे. इथे एखादी गोष्ट क्षणात अख्खा जगात व्हायरल होते. काही फोटो किंवा व्हिडिओ इतके ट्रेंड ( Viral Video) होतात की, प्रत्येकाच्या सोशल मीडियावर ते दिसून येतं...आणि मग काय तो ट्रेडिंग व्हिडिओ (Trending Video) किंवा टॉपिक बनतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. धक्कादायक असा हा व्हिडिओ पाहून अनेकल प्रश्न निर्माण होतात.
धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Shocking video viral)
पहाटेच्या वेळी साधारण 5.30 वाजताच्या सुमारास एक तरुणी आपल्या वडिलांसोबत मंदिरात जात होती. तेव्हा अचानक एक कार त्यांचा समोर येऊन थांबली त्यातून तोंडाला रुमाल बांधलेले तीन तरुण खाली उतरले आणि त्यातील एकाने तरुणीला पकडले. ती त्यांचा तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे. तर एका तरुणीने वडिलांना रोखून धरलं आहे. अखेर त्या तरुणचं अपहरण करण्यात आलं. वडील गाडी मागे धावत होते पण तरुणीला पळून नेण्यात अपहरणकर्त्यांना यश आलं. या घटनेचं सीसीटीव्ही (CCTV) फूटज समोर आलं असून ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
वडिलांची पोलिसांकडे धाव
मुलीचं अपहरण (kidnapped video) झाल्यामुळे वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटजेमध्ये अपहरणाची घटना कैद झाली. या एका पांढऱ्या कारमध्ये तरुणीचं अपहरण करताना दिसतं आहे. मात्र या गाडीवर नंबर प्लेट नव्हती.
कहाणीमध्ये Twist!
मुलीच्या अपहरण प्रकरणात आता ट्विस्ट आलाय. तरुणीचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात खुद्द त्या मुलीने अपहरणाचा नाट्यावरील परदा उचला आहे. ज्यामध्ये तिने सांगितलं की माझं अपहरण झालं नसून, मीच माझ्या अपहरणाचा कट रचला होता. तिने प्रियकरला तिला घेऊन जाण्यासाठी सांगितलं होतं. त्या तरुणीने आणि तरुणाने गावापासून 50 किमी अंतरावर असलेल्या मंदिरात लग्न केलं. (trending Video Telangana woman kidnapped Twist girl marries kidnapper Another video Viral on Social media)
गोलमाल है भाई सब गोलमाल है!
चित्रपटला शोभेल अशी ही एका लग्नाची गोष्ट...सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तेलंगणातील (Telangana) राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्यात ही घटना आहे. व्हिडिओमध्ये ती तरुणी तिच्या प्रियकरासह लग्नाच्या पोशाखात दिसतं आहेत. हे दोघे चार वर्षांपासून प्रेमात होते. मुलीचे आई वडील तिचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी करण्याचा विचार करत होते, त्यानंतर तिने तिच्या प्रियकराला तिला घेऊन जाण्यासाठी बोलावले.
पोलिसांकडे संरक्षणाची केली मागणी
तिने पोलिसांकडे संरक्षणही मागणी केली आहे. सुमारे 10 महिन्यांपूर्वी अल्पवयीन असलेली ही महिला तिच्या प्रियकरासह पळून गेली होती आणि त्यावेळी दोघांनी लग्न केले होतं. परंतु, ती अल्पवयीन असल्याने त्या व्यक्तीविरुद्ध पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोघांचेही पोलिसांनी समुपदेशन करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले, असं पोलिसांनी सांगितलं.