Trending Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. रस्ते अपघात असो किंवा स्टंट करताना झालेला अपघात असो असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. धक्कादायक, थरार आणि भीतीदायक असे हे व्हिडीओ पाहून अंगावर काटे आणतात. रेल्वे क्रासिंगवर हुशार लोकांच्या नाहक बळी गेल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून तुम्ही अस्वस्थ व्हाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रेल्वे क्रासिंगवर अनेक दुचाकीस्वार रस्ता ओलांडण्याची घाई करताना दिसत आहे. गंमत म्हणजे समोरून पहिलेच एक ट्रेन जात आहे. लोक जीवाची परवा न करताचा रेल्वे क्रासिंग ओलांडताना दिसून येत आहे.(trending video train accident at railway crossing shocking video viral social media)


अनेक वेळा सांगितलं जातं रेल्वे क्रासिंग करु नका जीवाला धोका आहे. तरीदेखील लोक जास्त शाहणी असतात ना, ती थोडी कोणाचं ऐकतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही असे अनेक हुशार दुचाकीस्वार बघू शकता. हा व्हायरल व्हिडीओ अनेक गोष्टी शिकवून जातो. 


ऐ भाई जीव महत्त्वाचा की..?


दुचाकीस्वार क्रासिंग ओलांडताना अचानक मागे फिरतात. त्या लोकांची तारांबळ पाहून लक्षात येतं की त्याचा डोळ्यासमोर त्यांना मृत्यू दिसत आहे. दुचाकीस्वारांची धावपळ सुरु असते अशात एका दुचाकीस्वाराची बाइक रेल्वे रुळावर पडते. एकीकडून मृत्यू धावत येतो आणि दुसरीकडे बाइक उचलण्याची त्याची धडपड, जीव महत्त्वाचा की बाइक असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून वाटतो. 



हा धक्कादायक व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. 28 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केला आहे.