Viral Video : `मेरे बॉयफ्रेंड से गुलु गुलु करेगी तो...`, भररस्त्यात मुलींचा दे दणादण राडा
Girls Fight Video : सोशल मीडियावर मुलींच्या मारामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात पण सध्या शाळेतील मुलींचा मारामारीचे एक व्हिडीओ चर्चा विषय बनला आहे. या मुलींच्या मारामारीचं कारण ऐकून तुम्ही पण अवाक् व्हाल.
Girls Fight Trending Video : मुलांची मारामारी ही काय नवीन गोष्ट नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये मुलींची आणि महिलांची हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडयावर (Social media) व्हायरल (Viral Video) झाले आहेत. मुंबई लोकल ट्रेनमध्ये तर सीटवरुन महिलांमधील (Mumbai Local trains) राडाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर ट्रेंडिंग होत असतात. सध्या सोशल मीडियावर शाळेकरी मुलींचा हाणामारीचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय बनवला आहे. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
'मेरे बॉयफ्रेंड से गुलु गुलु करेगी तो...'
रणवीर सिंह आणि आलिया भट्टचा गली ब्वॉयमधील फेमस डायलॉग आठवतो का? 'मेरे बॉयफ्रेंड से गुलु गुलु करेगी तो धोपतुंगी ना' यातील आलियाची छोटी बहीण रुप प्रत्यक्षात दिसलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चक्क शाळेकरी मुली बॉयफ्रेंडवरुन राडा करताना दिसत आहे.
नेमकं काय झालं?
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, शाळा सुटलेली दिसत आहे. त्यामुळे मुला मुलींची तुफान गर्दी आहे. अशात एका पांढऱ्या गाडी शेजारी तीन मुली एकमेकांशी बोलत असता. तेवढ्यात एक मुलगी दुसऱ्या मुलीची वेणी खेचून तिला मारायला सुरुवात करते. त्यानंतर दोघी एकमेकींना दे दणादण हाणामारी करायला लागतात. तिच्यासोबत असणारी तिसरी मुलगीही या राड्यामध्ये उडी घेते. (Trending Video two school girls fight for boyfriend viral Video on social media Watch now)
एकमेकांना लथा बुक्के मारत केस ओढत त्या तुफान हाणामारी करतात. भररस्त्यात मुलींचा राडा पाहून आजूबाजूचे विद्यार्थी थबकतात. अखेर दोन व्यक्तीनी हस्तक्षेप केला आणि पण त्या कोणालाही ऐकताना दिसत नव्हत्या. मिळालेल्या माहितीवरुन या दोघांच्या भांडणाचं कारण बॉयफ्रेंड होता. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतो आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवरील @gharkekalesh हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. तर कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.