Trending Video :  'मेरे यार की शादी है'...मित्राचं लग्न म्हटलं की एकच जल्लोष असतो. लग्न म्हटलं की सगळ्यात जास्त उत्साह असतो नवरदेवाच्या वरातीमध्ये डान्स करण्याचा...यासाठी मित्रमंडळी फुल्ल तयारीत असतात. सूटबूट घालून आपल्या मित्राच्या वरातीमध्ये डान्स करताना एक तरुण अचानक कोसळला...जल्लोष, उत्साह, धुमधडाक्याचं वातावरण क्षणात एका भयान शांतेत पसरलं. त्या तरुणाने कधी विचारही केला नसेल तो डान्स त्याचासाठी अखेरचा ठरला.


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मित्राच्या लग्नाच्या वरातीत नाचताना अचानक एक तरुण कोसळला. त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तेव्हा त्या तरुणाला हृदयविकाराचा झटक्या येऊन मृत्यू झालाचं डॉक्टरांनी घोषित केलं. ही घटना कानपूरमधील रीवा इथे घडली आहे. (Trending Video Uttar Pradesh Kanpur Rewa News young boy died during dancing in friends marriage Heart attack viral on Social media )


मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास वरात बसस्थानकाजवळील अमरदीप पॅलेस या लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचली.  त्यावेळी ही दु:खत घटना घडली. या तरुणाचं नाव अभय सचन असून तो 32 वर्षांचा होता. वरातीमध्ये तो उत्साहाने नाचत होता पण कोणाला काय माहिती हा क्षण त्याचा आयुष्यातील शेवटचा ठरणार आहे ते...



सकाळच्या वेळी जास्त धोका (risk of heart attack in the morning)


हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन होण्याची त्रास जास्त होता. अशा परिस्थितीत ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटक्या येण्याची दाट शक्यता असते. कारण रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे बीपी हाय होतो, अशातून हृदयविकाराचा झटका येतो. शिवाय थंडीत शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि हृदयविकाराचा झटका येतो. हिवाळ्यात, सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक असते, कारण यावेळी तापमान खूप कमी असतं. (heart attack chances are high in winter season know why)


 हिवाळ्यात अशी घ्या हृदयाची काळजी 


हिवाळ्यात पहाटे वॉकला जाऊ नका. वॉकला साधारण 9 वाजल्यानंतर निघावे. जेवणात शक्य तितके कमी मीठ कमी केलं पाहिजे. (less salt in food ) शरीरासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचं आहे, त्यावर लक्ष द्या . त्याचसोबत व्यायामाला प्राधान्य द्या (do exercise daily) आणि पोषक आहाराचं सेवन करा. (healthy food)