मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत काय?
व्हिडिओत एक महाकाय ठिपके असलेला अजगर (Python Video) दिसत आहे. हा अजगर जमीनीवर वेगाने चालत असल्याप्रमाणे झाडावर चढताना दिसत आहे. मोठा फना काढत झाडाला आपलं शरीर गुंडाळत हा अजगर चढताना दिसत आहे.अजगर झाडाभोवती आपला फना सुमारे 1 ते 2 मीटर सरळ उभा करतो, खालच्या भागातून झाडाभोवती फिरतो आणि वर चढतो. इतक्यात त्याची जाड शेपूट हवेत डोलत होती. अजगराला (Python Video) झाडावर चढताना हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा येत आहे.  



या अजगराची (Python Video) लांबी 7 ते 8 मीटर आणि त्याचे वजन 100-150 किलोपर्यंत असण्याची शक्यता आहे. तर इतक्या महाकाय अजगराला झाडावर चढणे सोपे काम नाही. पण अजगर झाडांवर चढण्यासाठी खास तंत्र अवलंबतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. एका ट्विटर य़ुझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.  


दरम्यान या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या कमेंट येत आहेत, एक युजर म्हणतो, "हा अजगर खूप भयानक आणि हुशारही आहे." तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, "हा माझ्या अपेक्षेपेक्षा वेगाने झाडांवर चढतो आहे." त्याचवेळी तिसऱ्या यूजरने लिहिले. , मला वाटते की या व्हिडिओचा वेग वाढवला गेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.