Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्...
Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. सजेशनमध्येही येतात. यातलाच हा एक व्हिडीओ. जो पाहताना देश नेमका कुठे चाललाय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
Viral Video : मागील काही वर्षांमध्ये भटकंती करणाऱ्यांचा आकडा झपाट्यानं वाढला आहे. फक्त फिरणंच नव्हे, तर फिरता फिरता आपल्या प्रवासातून मिळणारा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवणाऱ्या इंन्फ्लुएन्सर आणि व्लॉगर्सचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
एखाद्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती, सामान्य नागरिकांची दिनचर्या, त्यांचं राहणीमान आणि तत्सं सर्वच गोष्टींचं चित्रण करत त्या Instagram, You Tube, Facebook यांसारख्या माध्यमांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न ही समाजमाध्यमांवर सक्रिय असणारी मंडळी करत असतात. सध्या तुम्हालाही अशीच काही मंडळी हातात कॅमेरा घेऊन त्याच्यापुढं बोलताना दिसले असतील.
परदेशी ट्रॅव्हल व्लॉगर (Travel Vlogger) आणि त्यांना येणारे विचित्र अनुभव
आपण ज्यावेळी एखाद्या अनोळखी ठिकाणी जातो तेव्हा तिथं स्थानिकांकडून सहकार्याची अपेक्षा ठेवत असतो. अमुक एक ठिकाण आपल्यासाठी पूर्णपणे नवं असल्यामुळं तिथं वावरताना नाही म्हटलं तरी काहीसा संकोच वाटतोच. पण, त्यातही या संकोचावर आणि हळूच डोकावणाऱ्या भीतीवर मात करत ही भटकंती सुरुच राहते. भारतात मात्र परदेशी पर्यटक, व्लॉगरसना हल्ली असा अनुभव फार कमी मिळताना दिसत आहे. हे असं म्हणण्यास कारणीभूत ठरत आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ.
परदेशी You Tuber चा हात धरला अन्...
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये YouTuber Pedro Mota हा एक डच पर्यटक त्याचा व्लॉग शूट करत बंगळुरूच्या चिंचोळ्या वाटांवर चालत होता. त्यावेळी आलेला अनुभव त्यानं व्लॉगमधूनच मांडला. अचानकच एका माणसानं काहीसं चिडून माझा हात धरल्याचं सांगत जेव्हा आपण त्या ठिकाणहून पळ काढण्याचा प्रयत्न केल्याचं त्यानं सांगितलं.
पेड्रोसोबत नेमकं काय घडलं ते एका व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. जिथं त्याला अतिशय चुकिच्या पद्धतीनं अडवून, तो अतिशय समंजसपणे 'मला जाऊ द्या सर' असं म्हणतानाही समोरच्या व्यक्तीनं मात्र हार मानली नसल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडीओ पाहून ज्या भारताचा उल्लेख जगभरात Incredible India केला जातो तो नेमका कोणत्या बाबतीत अतुल्य / Incredible आहे असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
हेसुद्धा वाचा : Pregnant? हृतिकसोबत सबा मित्राच्या रिसेप्शनला पोहोचताच प्रश्नांना उधाण; एक कृती ठरली कारणीभूत
पोलिसांनी तातडीनं केली कारवाई
दरम्यान, परदेशी नागरिकासोबत घडलेल्या या प्रकरणाचा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा बंगळुरू पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सदरील व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केली. ज्यानंतर त्याच्याविरोधात Karnataka Police Act Section 92 अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला.