देवास : मध्यप्रदेशातील देवास जिह्ल्यात एक महत्त्वपूर्ण घटना घडली आहे. स्वच्छ भारत अभियानाचा संदेश  इतका बिंबवला गेला की तिने शौचालय बांधण्यासाठी चक्क दागिने गहाण ठेवले. इतकंच नाही तर ती गावातील इतरांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावाची लोकसंख्या फक्त ६३० इतकी आहे. अन्नपुर्णा या भील आदिवासी समाज्यातील आहेत. त्या आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांना चार अपत्य आहेत ज्यामध्ये दोन मुली आणि मुलं आहेत. अन्नपुर्णा यांचे पती मजुरीचं काम करतात.  


अन्नपुर्णा म्हणतात की, उघड्यावर शौचास जाण्यास लाज वाटते. म्हणून त्यांनी  शौचालय बांधण्यासाठी मिळणाऱ्या रक्कमेची वाट पाहिली. मात्र कुटुंबाच्या लाजेसाठी आणि सुरक्षिततेसाठी त्यांनी दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. 


अन्नपूर्णा यांच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर गावातील इतर लोक देखील शौचालय बांधण्यास तयार झाले आहेत. याच गावात राहणाऱ्या कालीबाई (६५) यांनी सांगितले की, आपल्या मुली-सुनांच्या लाजेसाठी आम्ही घरात शौचालय बांधले. अन्नपूर्णा आणि कालीबाई यांच्याकडून प्रेरणा घेत गावातील इतर महिलांनी पंचायतचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या अधिपत्याखाली शौचालय बांधण्यास प्रारंभ केला आहे. 


आता गावात निगरानी समितिची स्थापना झाली आहे. ही समिती सकाळी स्वच्छेतेचा संदेश देईल आणि गावातील लोकांना उघड्यावर शौच न करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करेल.