मुंबई : बर्गर किंगचा IPO डिसेंबर 2020 मध्ये लॉंच झाला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांचा जबरजस्त प्रतिसाद मिळाला होता. चांगल्या लिस्टींगनंतरही बर्गर किंगच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. अशातच गुंतवणूकदारांना कंपनीने फक्त 7 महिन्यात मालामाल रिटर्न दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्गर किंगचा आयपीओ डिसेंबरमध्ये ओपन झाला होता. त्याचा प्राइस बँड 59 - 60 रुपयेप्रति शेअर होते तर शेअर मार्केटमध्ये त्याचे लिस्टिंग 108.4  रुपये झाली होती. सध्या हा शेअर 180 रुपयांच्या आसपास आहे.


आता पर्यंत बर्गर किंगचा शेअर आपल्या इश्यु प्राइसपेक्षा 200 टक्के वाढला आहे. आयपीओत गुंतवणूक करणारे शेअरधारकांना आता तिप्पट नफ्यात आहेत.


आयपीओची लॉट साईज 250 शेअर्सची होती. ज्या रिटेल गुंतवणूकदारांनी 15 हजार रुपये लावले होते त्यांचे आता 45 हजार रुपये झाले असणार आहे.


कंपनीने भारतात आपले पहिले रेस्टॉरंट नोव्हेंबर 2014 मध्ये सुरू केले होते. कंपनीचे देशात सध्या 17 राज्यातील 57 शहरांमध्ये 268 रेस्टॉरंट आहे.