भाजपमध्ये गेल्याने, आपल्याच माणसांनी मशिदीत नमाज पठणास रोखलं...
त्रिपुरामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एका गावात समर्थकांमध्ये विभाजन झाले आहे. त्यात भाजपला समर्थन करणाऱ्या व्यक्तींना मशिदीत नमाज पठण करण्यास रोखले.
आगरतळा : त्रिपुरामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एका गावात समर्थकांमध्ये विभाजन झाले आहे. त्यात भाजपला समर्थन करणाऱ्या व्यक्तींना मशिदीत नमाज पठण करण्यास रोखले.
दक्षिण त्रिपुराच्या शांतीबाजार मतदारसंघात मोईडाटीला गावात सुमारे १०० शेतकरी कुटुंब आहेत. यातील ८३ कुटुंब हे मुस्लिम आहेत. त्यातील २५ कुटुंबांनी काही दिवसांपूर्वी भाजपला समर्थनाची घोषणा केली. त्यानंतर भाजप विरोधी मुस्लिम कुटुंबानी या २५ कुटुंबाना नमाज पठण करण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यामुळे आता या कारणामुळे गावात दोन मशीद झाल्या आहेत.
यात जुन्या मशीदीत भाजप विरोधी नमाज पठण करतात तर दुसरी तात्पुरती तयार करून भाजप समर्थक मुस्लिम या ठिकाणी नमाज पठण करीत आहेत.
द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार एका मुस्लिम व्यक्तीने सांगितले की, १६ महिन्यापूर्वी आम्ही भाजपात प्रवेश केला. त्यानंतर मशिदीतील लोकांनी आम्हांला नमाज पठण करण्यास विरोध केला. हिंदुत्ववादी पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे या मशिदीत येण्याची गरज नाही. तुम्ही हिंदूसोबत जाऊ शकतात, असे जुन्या मशिदीतील लोकांना भाजप प्रवेश करणाऱ्या मुस्लिमांना सांगितले.
आता २५ मुस्लिम कुटुंबांनी तात्पुरते मशीद तयार केले असून वर्गणी गोळा करून नवीन मशीद बांधण्याचा मनोदय भाजप समर्थक मुस्लिमांनी केला आहे.