जम्मू : सीमा सुरक्षा दलाचे जवानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा डाव मोडून काढला आहे. बीएसएफच्या जवानांनी हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे पुन्हा एक बोगदा शोधून काढला. अवघ्या दहा दिवसांच्या आत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दुसरा बोगदा शोधण्यात यश मिळाल आहे. हा बोगदा  १५० मीटर लांब असून ३० फूट खोल आहे. पाकिस्तानी गुप्तचर विभागाने भारतात घुसखोरी करण्यासाठी हा कट रचला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी दहशतवादी कायम भारताविरोधात कट रचत असतात. याआधी पाकिस्तानमधील शंक्करगड भागात एक बोगदा अढळला होता. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बीएफएस जवानांच्या तुकड्या तात्काळ या कामासाठी रवाना झाल्या. त्यानंतर आज  हीरानगर सेक्टरमध्ये  १५० मीटर लांब असून ३० फूट खोल बोगदा अढळला. 



दरम्यान सांबा, हीरानगर आणि कठुआ या क्षेत्रात गेल्या सहा महिन्यात अढळलेला हा चौथा बोगदा असून जम्मू क्षेत्रातील दहावा बोगदा आहे. म्हणून बीएसएफचे जवान पाकिस्तानच्या कुरापतींवर सतत नजर ठेवून आहेत. 



भारतात घुसखोरी करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे बोगदे इंजीनियर व्यक्तीच्या मदतीने करण्यात आल्याची माहिती सुरक्षा विभागाने दिली आहे. सुरक्षा यंत्रणा याबाबत अधिक तपास करत आहे.