हैदराबाद : तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील जमन वादात महिलेला लाथ मारणाऱ्याच्या आरोपात पोलिसांनी टीआरएस नेता आणि स्थानिक ग्रामीण प्रमुखाला अटक केली आहे. टीआरएसशी संबंधित मंडळ परिषदचा अध्यक्ष (एमपीपी) इमादी गोपीवर महिला ए. राजवा यांच्याशी मारहाण केल्याचा आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आहे.  या घटनेनंतर या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांनी याची खूप निंदा केली.  तसेच गोपी यांनीही महिले विरोधात आणि तिच्या परिवाराविरोधात संपत्तीचं नुकसान करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.


छातीवर लाथ 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणामधील निझामाबाद इथं हा लाजीरवाणा प्रकार घडला आहे. येथे सत्तेवर असलेल्या तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) पक्षाचे नेते इम्मादी गोपी आणि एका महिलेत वाद झाला. हा वाद जमिनीच्या वादातून झाला असल्याचं समोर येत आहे. वाद इतका वाढला की, इम्मादी गोपी यांनी चक्क महिलेच्या छातीवर लाथ मारली. तेलंगानातील निझामाबाद जिल्ह्यामधील इंदालवई गावात ही घटना घडली आहे. टीआरएसचे नेते गोपी आणि गावातील महिलेत जमिनीच्या विषयावरुन वाद झाला. यावेळी महिलेने गोपी यांना मारण्यासाठी चप्पल उचलली. मात्र, त्यापूर्वी गोपी यांनी महिलेला लाथ मारली.


व्हिडिओ व्हायरल 


गोपी यांनी महिलेला लाथ मारताच तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तिने गोपी यांना जोरात धक्का दिला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या प्रकरणी इम्मादी गोपी यांच्या विरोधात पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर इम्माद गोपी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.