चंदिगड : Tuition Teacher : एक धक्कादायक बातमी. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी बातमी. शिकवणीच्या शिक्षकाने विद्यार्थिनीला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ (Porn Video) दाखवला. मात्र, विद्यार्थीनीने हा व्हिडिओ पाहण्यास नकार दिल्यानंतर तिला धमकी दिली. हरियाणातील जिंदमध्ये शिकवणी शिक्षिकाचे (Tuition Teacher) अत्यंत लाजिरवाणे कृत्य समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थिनीला शिकवणीच्या दरम्यान जबरदस्तीने पॉर्न दाखवल्याप्रकरणी जिल्हा पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पीडित विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महिला पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थिनी अंकुर नावाच्या व्यक्तीकडे ट्यूशन शिकण्यासाठी जात असे. त्यांनी पुढे सांगितले की, घरी ट्युशन शिकवत असताना शिक्षक अंकुर यांने विद्यार्थिनीला जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ दाखवला. मुलीने घरी जाऊन पालकांकडे याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुलीने ट्यूशनला जाणे बंद केले.


विद्यार्थीनीने शिकवणीला जाणे केले बंद 


तक्रारीनुसार, घटनेनंतर विद्यार्थिनीने ट्यूशनला जाणे बंद केले. तेव्हा अंकुर याने तिचा पाठलाग सुरू केला. एके दिवशी अंकुरने वडिलांच्या गाडीसमोर बाईक लावून जीवे मारण्याची धमकीही दिली. या धमकीप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यात येत असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.