मेरठ : उत्तरप्रदेशमध्ये कोरोनामुळे एका दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 25 वर्षीय युवकाचा गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये मृत्यू झाला. तर तर मेरठमध्ये 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 105 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर 400 हून अधिकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. या सर्वांना ऑब्जर्वेशनखाली ठेवण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

25 वर्षीय तरुणाचे आज कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गेल्या 3 तीन महिन्यांपासून आजारी होता आणि घरीच होता. त्याशिवाय त्याला किडनीची समस्याही होती. या तरुणाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, त्याच्यावर इलाज करणाऱ्या डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफला आयसोलेट करण्यात आलं आहे. त्याशिवाय तरुणाच्या संपर्कात आलेल्यांचा तपासही सुरु आहे.


72 वर्षाय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे वृद्ध महाराष्ट्रातील अमरावतीहून आलेल्या कोरोना संसर्ग झालेल्या इकरामुद्दीन हसन याचे ते सासरे होते. इकरामुद्दीन यांच्याकडून मेरठमध्ये कोरोनाची एन्ट्री झाली. 27 मार्च रोजी इकरामुद्दीन यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. इकरामुद्दीन यांच्या कुटुंबातील 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 


तर, आंध्र प्रदेशमध्ये आज कोरोनाचे ४३ जण आढळले आहेत. हे सर्वजण मरीज निजामुद्दीन मरकज सभेसाठी गेले होते. याआधी मंगळवारी मरकज येथून परतलेल्या १६ जणांना कोरोना झाल्याचे समोर आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली.


दरम्यान, आरोग्य मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 386 नवीन कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तबलीगी जमात प्रकरणानंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तबलीगी जमातीतील अनेक संशयितांची चाचणी सुरु आहे.