मुंबई : पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही लोकांना एखाद्या गोष्टीची complaint करण्यासाठी गेलेले एकले किंवा पाहिले असाल, पण यूपीच्या शामली जिल्ह्यात एक वेगळाच किस्सा घडला आहे. येथे एक माणुस  चक्क आपलं लग्न जमत नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांना मला वधू शोधा अशी विनंती करु लागला. ही गोष्ट सोशल मीडियावरती वाऱ्यासारखी पसरु लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस स्टेशनमध्ये लग्नासाठी विनंती
पोलीस स्टेशनमध्ये लग्न करण्याची विनंती करणा-या या दोन फूट उंच माणसाचं नाव अजीम आहे. तो २६ वर्षांचा आहे. गेल्या मंगळवारी अझीम शामली येथील एका पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याचे कुटुंबीय त्याचं लग्न करत नसल्याचे सांगितले. त्यानंतर अझीमने पोलिसांना स्वतःसाठी वधू शोधून लग्न करण्याची विनंती केली.


'छोटे मिया' च्या लग्नावर पोलिसांची प्रतिक्रिया
अजीमच्या विचित्र विनंतीवर पोलीस स्टेशनचे एसएचओ नीरज चौधरी म्हणाले की, लोकांचे लग्न पार पाडण्यात पोलिसांची कोणतीही भूमिका नाही. ते म्हणाले की, जर जोडप्यामध्ये भांडण असेल तर आम्हीते सोडवू शकतो, पण कोणासाठी वधू शोधणे हे आमचं काम नाही.


अजीमच्या लग्नासाठी घरच्यांची प्रतिक्रिया
अजीमचा परिवार हा यूपीच्या कैरानेमध्ये रहातो. त्याच्या  कुटुंबियांचं असं म्हणन आहे की, आमचं तर त्याचं लग्न करुन देण्याची इच्छा आहे, पण कोणतीही मुलगी त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार नाही. आजीमच लग्न झालं तर आम्हाला खूप आनंदचं होईल.


अझीमचा भाऊ मोहम्मद नईमच्या म्हणण्यानुसार अझीम शारीरिक दृष्ट्या कमजोर आहे. त्याचा हात कमजोर आहे. त्याचं लग्न व्हावं अशी आमची इच्छा आहे, कोणीतरी त्याची काळजी घेणारं असावं असं आम्हालाही वाटतं. पुढे ते म्हणाले की, अझीमच्या लग्नासाठी आम्हाला अनेक प्रस्ताव आले. मुरादाबादहूनही एक आलं आहे. आम्ही तिथे मुलीला भेटायला जाण्याचा विचार करतोय. मात्र, अझीमचे म्हणणे आहे की त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याच्या लग्नाबाबत गंभीर नाहीत.