दोन तरुणांना रस्त्यात मिळाला सेल्फ चेक, पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचताच समोर आलं विचित्र प्रकरण
दोन तरुणांनी कथितरित्या 2 लाख रुपयांचा एक पडलेला चेक सापडला, तेव्हा ते या चेकवरील रक्कम मिळवण्यासाठी अंबिकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
मुंबई : एक अशी घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दोन तरुणांसोबत विचित्र घटना घडल्याचे प्रकरण उघड झाले आहे. खरंतर शहरात फिरत असताना 2 तरुणांची नजर रस्त्यावर पडलेल्या कागदावर पडली. त्या तरुणांना नंतर लक्षात आले की, तो चेक आहे. ज्यामुळे त्यांनी तो उचलला, त्यावेळी त्यांना चेक पाहून धक्का बसला. कारण तो चेक दोन लाख रुपयांचा सेल्फ चेक होता. या चेकच्या पुढे आणि मागे सही होती. हे पाहून दोघेही खूश झाले आणि चेक कॅश करण्यासाठी थेट बँकेत गेले.
परंतु बँकेत गेल्यावर मात्र या दोन्ही तरुणांचा प्लान फसला. कारण तेथील बँक कर्मचाऱ्याच्या समजुतीमुळे दोघेही पकडले गेले. बँक कर्मचाऱ्याने घटनास्थळी पोलिसांना कॉल करुन बोलावले. एवढेच नाही तर हा चेक ज्या व्यक्तीचा आहे, त्याच्या मालकाला बोलावण्यात आले.
यानंतर या तरुणांना पोलिस कोठडीत नेण्यात आले. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दोन तरुणांनी कथितरित्या 2 लाख रुपयांचा एक पडलेला चेक सापडला, तेव्हा या चेकवरील रक्कम मिळवण्यासाठी अंबिकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्याला या तरुणांवर संशय आला, जेव्हा या व्यक्तीने या गोष्टीची पडताळणी केली, तेव्हा हे प्रकरण वेगळेच निघाले.
बँकेत धनादेश घेऊन पैसे काढण्यासाठी आलेले महुआपारा येथील रहिवासी कुणाल प्रधान आणि आयुष यांनी सांगितले की, ते फिरत फिरत गोधनपूर येथील वसुंधरा कॉलनीत पोहोचले असता, वाटेत त्यांना घडी घातलेला कागद दिसला. तो उचलला असता दोन लाख रुपयांचा चेक असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी हा चेक सेल्फ चेक असल्यामुळे आपण तो क्लेम करु असे त्या दोघांनी ठरवले.
परंतु त्यांचा हा प्लान फसला आणि आता त्यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागत आहे. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.