इटानगर : ६ समाजांना नागरिकत्व देण्याच्या मुद्द्यावरून अरूणाचल प्रदेशात हिंसाचार उसळला आहे. आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २ जण ठार तर तीन जखमी झाले आहेत. अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या खासगी घरावर आंदोलकांनी हल्ला केल्यावर पोलिसांनी गोळीबार केला. आंदोलकांनी तुफान दगडफेक करायला सुरूवात केली. आंदोलक खूपच उग्र झाले होते. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दोन युवकांचा बळी गेला आहे. तर शुक्रवारी रात्री पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या एका आंदोलकाचा मृतदेह इंदिरा गांधी उद्यानात ठेवण्यात आला आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेतही तोडगा निघाला नाही. गेल्या काही दिवसांपासून अरूणाचल प्रदेशात विविध ठिकाणी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर हिंसाचार उसळला आहे. आर्मीनेही ध्वज संचलन केलं मात्र हिंसाचार घटलेला नाही.


मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या हिंसेमागे कोणाचा तरी हात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.




काय आहे आंदोलकांची मागणी?


पीआरसी मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम द्यावा, आंदोलकांची सूटका करावी आमि मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रान्सफर करावी अशी आंदोलकांची मागणी आहे. 


पोलिसांनी माहिती दिली की, आंदोलकांनी अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चाउना मीन यांच्या निवासस्थानी आग लावली. तर उपायुक्त कार्यालयात तोडफोड केली.


शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये एका जखमी व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर लोकं रस्त्यावर उतरले आणि अनेक सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं.