श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील तुरकावनगाम भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना प्रथम घेरले आणि मग ठार केले. काही दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने त्या भागात शोध मोहीम राबविली. ज्यामध्ये तिन्ही दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य करत फायरिंग केली. दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही.


जम्मू-काश्मिरीमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध सातत्याने शोध मोहीम राबविली जात आहे. दहशतवाद्यांना खोऱ्यात शोधून शोधून ठार केले जात आहे. याआधी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाली होती. त्यावेळी सुरक्षा दलाने दोन अतिरेकी ठार केले.


कुलगाम जिल्ह्यातील निपोरा येथे या भागात शोध मोहिम सुरु असताना सुरक्षा दलावर अचानक गोळीबार झाला. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर सुरक्षा दलाने दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले.