नवी दिल्ली : भारतानं पाकिस्तानच्या अखत्यारित असणाऱ्या काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या रात्री चूकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या चंदू चव्हाण या जवानाचा मनस्ताप वाढला आहे. याप्रकरणी आधी तब्बल चार महिने चंदू चव्हाणची चौकशी झाली. त्यानंतर न्यायालयानं त्याला ८९ दिवसांची शिक्षा दिली. निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी चंदूला १५ वर्ष सेवा करणे बंधनकारक आहे. चंदूला मात्र दोन वर्ष अतिरिक्त सेवा द्यावी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी लष्कराकडून भारतीय हद्दीत सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यांमुळे संतापाच्या भरात पाकिस्तानी सीमेत घुसल्याचं चंदूनं चौकशीत कबूल केलं. त्याचाच परिणाम म्हणून चंदू चव्हाणला फटका बसला आहे.


दोन्ही देशांच्या डिरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स पातळीवर 15 ते 20 वेळा या प्रकरणी बोलणी झाल्यानंतर भारताच्या शिष्टाईला यश आलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने चंदूंची सुटका करत असल्याचं जाहीर केलं होतं. जानेवारी 2017 मध्ये चंदू अटारी-वाघा सीमेवरून भारतात आले होते.