नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात सुरु आहे. प्रवासी टॅक्सी सेवा देणाऱ्या उबेर कंपनीने नुकतीच १४ टक्के कर्मचारी कपात केली. झूप एपवर घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉलवर कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. साधारण ३ मिनिटभर चाललेल्या या कॉलनंतर ३५०० कर्मचारी बेरोजगार झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उबर कस्टरमर कंपनीचे प्रमुख शेवॉलो यांनी झूम एपवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि ३५०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत असल्याची माहिती दिली. मंदीचे दिवस असून कर्मचाऱ्यांसाठी ठराविक काम आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांचा आजचा कामाचा शेवटचा दिवस असल्याचे त्यांनी कॉलवर सांगितले. 


सध्या कंपनीचा व्यवसाय निम्म्यावर आल्याने कर्मचाऱ्यांचे पगार देणं शक्य नाही. उबेरला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात २.९ अरब डॉलरचे नुकसान झाले. यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले. विदेशातील कंपनीच्या गुंतवणुकीवर देखील वाईट परिणाम झाले आहेत. 



कोरोना वायरसचे संकट संपूर्ण जगावर आलंय. भारतातही याचे ५० हजाराहून अधिक रुग्ण असून हजारों मृत्यूमुखी पडली आहे. 


देश ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशा ३ झोनमध्ये विभागण्यात आलाय. दरम्यान नव्या नियमानुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये उबेर सारख्या टॅक्सी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही प्रवाशाला चालकाच्या बाजुला बसण्याची परवानगी नसेल. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत ही परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनमध्ये अशी कोणतीही परवानगी देण्यात आली नाही.