मुंबई : UIDAI Aadhaar Card : आधार कार्ड आता सर्वसामान्यांची ओळख झाली आहे. प्रत्येक शासकीय कामासाठी तसेच बँकेसाठी आधार कार्ड महत्वाचे झाले आहे. प्रत्येकाला आधार कार्ड मिळावे आणि त्याची सेवा घेता यावी यासाठी UIDAIने देशातील 53 शहरांमध्ये 114 आधार सेवा केंद्रे (Aadhaar Seva Kendras) उघडण्याची योजना आखली आहे. UIDAIच्या या केंद्रांवर आधारशी संबंधित सर्व सेवा लोकांना एकाच ठिकाणी पुरवल्या जातील.(UIDAI has planned to open 114 Aadhaar Seva Kendras in 53 cities of the India)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 देशभरात 35 हजारांहून अधिक आधार केंद्रे आहेत. जे बँका, पोस्ट ऑफिस, बीएसएनएल आणि राज्य सरकारच्या मदतीने चालवले जात आहेत. परंतु UIDAI द्वारे उघडली जाणारी नवीन 114 आधार सेवा केंद्रे स्वतःच चालवली जातील. या सेवा केंद्रांवर तुम्हाला अनेक सुविधा मिळणार आहेत. ही सेवा केंद्र उघण्याबाबतची माहिती UIDAI च्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन देण्यात आली आहे.



आधार कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. युनिक आयडी क्रमांक असलेले आधार कार्ड देशातील सर्व नागरिकांना UIDAI द्वारे जारी केले जाते. ज्यामध्ये बायोमेट्रिकसह तुमच्याशी संबंधित अनेक माहिती असते. त्याचबरोबर आधार कार्डाशिवाय सरकारी योजना आणि बँकिंग सुविधांचा लाभ घेता येणार नाही. यासोबतच आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.



आधार सेवांसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट - आधार सेवा केंद्र प्रकल्पासह, UIDAIने ग्राहकांसाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंग सुविधा सुरु केली आहे. UIDAI द्वारे संचालित सर्व आधार सेवा केंद्रे ऑनलाइन अपॉइंटमेंट सिस्टमचे अनुसरण करतात, जिथे कोणीही आधार नोंदणीसाठी अपॉइंटमेंट बुक करु शकतो किंवा कोणत्याही सोयीस्कर ASK वर अपडेट करु शकतो.