कसा कराल आधारकार्डवरील जन्मतारीख, नावात बदल?
नावात झालेला बदल ऑनलाइन कसा चेक कराल?
नवी दिल्ली : ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अगदी आवश्यक आहे. सर्वच ठिकाणी आधार कार्ड दाखवावं लागतं. पण अनेकदा आधारकार्डमध्येच चुका झालेल्या असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लोकांच्या अडचणी लक्षात घेता, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात (UIDAI)ने आधारमध्ये नाव, फोन नंबर, जन्मतारिखेत बदल करण्यासाठी आपल्या नियमांत काही बदल केले आहेत.
आधार कार्डमध्ये सर्वाधिक चुका या जन्म तारखेत झाल्या असल्याचं पाहायला मिळालं. जन्म तारखेत काही चुका असल्यास त्या आधार केंद्रात जाऊन सुधारता येऊ शकतात.
UIDAIने आधारकार्डमध्ये जन्म तारीखेत बदल करण्यासाठी काही अटी सांगितल्या आहेत. त्यानुसार, आधारकार्डवर नमूद असलेली तारीख आणि प्रत्यक्षात असलेल्या जन्म तारखेमध्ये तीन वर्षांचा फरक असेल तर, तुम्ही कोणत्याही आधार सुविधा केंद्रावर जाऊन त्यात बदल करु शकता. जन्मतारखेत बदल करण्यासाठी आधार केंद्रात बर्थ सर्टिफिकेट, पॅनकार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही कागदपत्र दाखवू शकता.
जर आधार कार्डवरील नावात काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यसाठी UIDAIकडून आधारमध्ये नाव बदलण्यासाठी दोन वेळा संधी देण्यात आली आहे. नावात दुरुस्ती करण्यासाठी आपला पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा कोणतेही सरकारी कागदपत्र दाखवू शकता आणि जवळच्या आधार केंद्रावर आपलं नाव दुरुस्त करुन घेऊ शकता.
नावात झालेला बदल ऑनलाइन कसा चेक कराल?
- पत्ता, नावात झालेले बदल ऑनलाइन चेक करण्यासाठी https://uidai.gov.in/ या वेबसाइटवर जा.
- होमपेजवर अपडेट आधार सेक्शनमध्ये Check online address Update status वर क्लिक करा.
- त्यावर १२ अंकी आधार क्रमांक टाइप करा. सोबतच तुमचा URN-SRN क्रमांकही टाका
- त्यानंतर खालील दिलेल्या बॉक्समधील Captcha Verification कोड टाइप करा आणि चेक स्टेटसवर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर आधार अॅड्रेस रिक्वेस्टचं सद्यस्थितीतील स्टेट्स दिसेल.