30 वर्षांनंतर महिलेने तोंड उघडले, UK-दुबईतील डॉक्टरांना जे जमले नाही ते भारतीय डॉक्टरांनी करुन दाखवले
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलमधील (Sir Gangaram Hospital) डॉक्टरांनी मोठे यश मिळवले आहे. चक्क एका महिलेने तब्बल 30 वर्षांनंतर आपले तोंड उघडले.
मुंबई : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलमधील (Sir Gangaram Hospital) डॉक्टरांनी मोठे यश मिळवले आहे. चक्क एका महिलेने तब्बल 30 वर्षांनंतर आपले तोंड उघडले. हा करिष्मा भारतीय डॉक्टरांनी करुन दाखवला आहे. UK-दुबईतील डॉक्टरांना जे जमले नाही ते भारतीय डॉक्टरांनी करुन दाखवले आहे. या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 30 वर्षांनंतर महिलेच्या जबड्याच्या हाड आणि कवटीच्या हाड जन्माच्यावेळी एकत्र झाले होते. यामुळे त्याचे तोंड उघडू शकले नाही. ते ऑपरेशन करुन वेगळे केले आहे. त्यामुळे या महिलेला तोंड उघडता आले आहे.(UK-Dubai doctors could not do the work, Indian doctors did; 30 years later, the woman opened her mouth)
दीड महिन्यापूर्वी (फेब्रुवारी 2021), आस्था मोंगिया यांना दिल्ली येथे सर गंगा राम हॉस्पिटलच्या प्लास्टिक सर्जरी विभागात आणले गेले. त्या पंजाब नॅशनल बँकमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात. ऑपरेशननंतर आस्था या पूर्णपणे ठीक झाल्या आहेत आणि त्यांचे तोंड जवळजवळ 3 सेंटीमीटर उघडण्यास यशस्वी झाले आहे.
जन्मापासून जबडा आणि तोंडाचा हाड एकत्रच
आस्था मोंगिया जन्मापासून त्रस्त होती आणि तिच्या जबड्याचे हाड तोंडाच्या दोन्ही बाजूंच्या कवटीच्या हाडांशी जोडले गेले होते. यामुळे तिला तोंड उघडता येत नव्हते. अगदी तिला तिच्या बोटाने जिभेला स्पर्शही करता येत नव्हता आणि काहीही खाता येत नव्हते. केवळ द्रव पदार्थ घेत होती. तोंड न उघडल्यामुळे दातांमध्ये संसर्ग पसरला होता आणि केवळ काही दात शिल्लक आहेत.
यूके-दुबई रुग्णालयांकडून शस्त्रक्रिया करण्यास नकार
सर्वात मोठी समस्या अशी होती की यामहिलेचा संपूर्ण चेहरा रक्ताच्या गाठी आणि नसाने भरलेला होता. यामुळे, कोणतेही रुग्णालय शस्त्रक्रियेसाठी तयार नव्हते. कुटुंबाने या महिलेला भारत सोडून यूके आणि दुबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवले होते. परंतु सर्वांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला.