Atique Ahmed Son Encounter: `या` 12 जणांच्या पथकाने अतिक अहमदच्या मुलाचा केला एन्काऊंटर
Atique Ahmed Son Encounter: एसटीएफने गुरुवारी झाशीमध्ये अतिकअहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम याला चकमकीत ठार केले. चकमकीनंतर अतिक आणि मुलगा अशरफ यांनी असदचे एन्काउंटर झाल्याचे सांगताच अतिक आणि त्याचा भाऊ रडायला लागले.
Atique Ahmed Son Encounter : बहुचर्चित उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आणि गँगस्टर अतिक अहमदचा मुलगा (Atique Ahmed) पोलिसांकडून एन्काऊंटर ठार झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने (UP STF) या प्रकरणातील आरोपी अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार शूटर गुलाम यांना चकमकीत ठार केले आहे. झाशीमध्ये अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलामसोबत उत्तर प्रदेश एसटीएफची चकमक झाली. त्यानंतर असद अहमद आणि गुलाम चकमकीत ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उमेश पाल हत्याकांडात सहभाग असल्याने गेल्या 50 दिवसांपासून उत्तर प्रदेश पोलीस दोघांच्या शोधात होती. अखेर झाशी येथे दोघांनाही ठार करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी यश आले आहे.
उत्तर प्रदेश पोलीस बराच वेळ असदच्या मागावर होते. उत्तर प्रदेश एसटीएफच्या 12 जणांच्या पथकाने ही कारवाई करत दोघांना ठार केले आहे. या चकमीमध्ये दोन पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक उपनिरीक्षक, काही हेड कॉन्स्टेबल आणि कमांडो यांचा समावेश होता. यापूर्वी असदला जिवंत पकडण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला शरण येण्यासही सांगण्यात आले होते. मात्र त्याने ऐकले नाही आणि तो चकमकीत ठार झाला. या चकमकीत असदचा सहकारी गुलामही मारला गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघांकडूनही विदेशी बनावटीची ब्रिटीश बुलडॉग रिव्हॉल्व्हर 455 बोअर आणि वॉल्थर पी-88 पिस्तूल 7.63 बोअर ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
या 12 जणांच्या पथकाने केला एन्काऊंटर
या कारवाईत उपअधीक्षक नवेंदु कुमार, उपअधीक्षक विमल कुमार सिंह, इन्स्पेक्टर अनिल कुमार सिंग, इन्स्पेक्टर ज्ञानेंद्र कुमार राय, उपनिरीक्षक विनय तिवारी, हेड कॉन्स्टेबल पंकज तिवारी, हेड कॉन्स्टेबल सोनू यादव, हेड कॉन्स्टेबल सुशील कुमार, हेड कॉन्स्टेबल सुनील कुमार, हेड कॉन्स्टेबल भूपेंद्र सिंग, कमांडो अरविंद कुमार, कमांडो दिलीप कुमार यादव यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुसरीकडे संपूर्ण कारवाईचे नेतृत्व उपअधीक्षक नवेंदू कुमार आणि उपअधीक्षक विमल सिंह यांनी केले. नवेंदू कुमार यांनी यापूर्वीही अनेक गुन्हेगारांना ठार केले आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना 2008 मध्ये राष्ट्रपती शौर्य पुरस्कार आणि 2014 मध्ये राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिल्यानंतर त्यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले. यासोबत तात्काळ कायदा आणि सुव्यवस्थेबाबत महत्त्वाची बैठक बोलावली.
मुलाच्या मृत्यूनंतर रडायला लागला अतिक अहमद
प्रयागराज कोर्टात जेव्हा अतीक अहमदला मुलगा ठार झाल्याची माहिती मिळाली तेव्हा तो रडायला लागला. चकमकीत भाचा मारला गेल्याने अतिक अहमदचा भाऊ अशरफही भावूक झाला होता. उमेश हत्यांकांड प्रकरणी अतिक अहमदला कोर्टात हजर करण्यात आले होते. दुसरीकडे उमेश पाल यांच्या पत्नी जया पाल यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.